मुंबई : शेअर बाजारातील 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला एक अनुभवी गुंतवणूकदार आहेत. त्यांच्या पोर्टफोलिओवर अनेकांची नजर असते. तुम्हालाही तुमचा पोर्टफोलिओ राकेश झुनझुनवाला यांच्यासारखा बनवायचा असेल, तर आम्ही तुम्हाला 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचा सोपा फॉर्म्युला आज सांगणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झुनझुनवाला यांच्या काही सूत्रांचा वापर करून तुम्हीही तुमचा पोर्टफोलिओ राकेश झुनझुनवाला यांच्यासारखा मजबूत बनवू शकता. शेअर बाजारात गुंतवणूक करून बंपर कमाई करण्यापूर्वी राकेश झुनझुनवाला यांच्या काही खास टिप्स नक्की जाणून घ्या.


राकेश झुनझुनवाला म्हणतात की, चूक करण्यास कधीही घाबरू नका. शेअर बाजारात पैसे गुंतवताना अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यात अनेक वेळा चुका होतात. पण आपल्याला आपली प्रत्येक चूक काही नवीन शिकवून जाते. 


राकेश सांगतात की, जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये चूक होण्याची भीती वाटत असेल तर, तुम्ही निर्णय घेऊ शकणार नाही. त्यांच्याकडूनही चुका होतात. एकदा कंपनीत पैसे गुंतवून त्यांना सुमारे 150 कोटी रुपयांचा नुकसान सहन करावं लागला.


राकेश झुनझुनवाला यांनी 5 हजार रुपयांपासून त्यांचा प्रवास सुरू केला. त्यानंतर सीएच्या मदतीने अवघ्या 2 वर्षांत त्यांची एकूण संपत्ती 50 लाख रुपये झाली. 


राकेश यांच्या मते 1990 च्या अर्थसंकल्पाचे अत्यंत महत्त्वपूर्ण होते. ज्यामुळे बाजारात प्रचंड तेजी आली. त्यावेळी झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती 2 कोटी होती, जी कालांतराने 20 कोटी झाली.


राकेश सांगतात की, मार्केटमध्ये रिस्क घेणं खूप गरजेचं आहे, पण त्या रिक्सच्या परिणामांबद्दल देखील तुम्हाला कल्पना असायला हवी. त्यांच्या प्रगतीमागे काही रहस्य आहेत. राकेश झुनझुनवाला यांच्या त्या 5 टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत.


जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर सर्वप्रथम स्टॉक टिप्सपासून दूर राहा. स्वतः अभ्यास करा आणि त्यानंतरचं गुंतवणूक करा. 


महत्त्वाचं म्हणजे ते कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात, याची माहिती त्यांच्या पत्नीला देखील नसते. मग त्यांच्या शेअर्सबद्दल इतरांना कशी माहिती मिळेल. 


राकेश म्हणतात, जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी ठरवा की, तुम्हाला गुंतवणूक करायची आहे की फक्त ट्रेडिंग. 


ट्रेडिंग तुम्हाला अचानक नफा देतो, परंतु त्यात खूप नुकसान होण्याची शक्यता देखील आहे. तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल आणि गुंतवणुकीसोबतच ट्रेड करायचा असेल तर दोन्ही पोर्टफोलिओ वेगळे ठेवा.


राकेश म्हणतात की शेअर बाजार उत्तम आहे. जर तुम्ही शेअर मार्केटला महत्त्व देवू शकत नसाल तर तुम्ही चुकांमधून काही शिकू शकणार नाही. 


असे अनेक लोक आहेत जे शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्यावर आपल्या निर्णयाला चुकीचे म्हणण्याऐवजी शेअर मार्केटला चांगले-वाईट म्हणायला लागतात. जर तुम्ही शेअर बाजाराला सर्वोच्च मानत नसाल तर तुम्हाला शेअर बाजारातून कधीही चांगला पैसा मिळवता येणार नाही.