नवी दिल्ली : आपण अद्याप आपले पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्डशी (Aadhaar card) लिंक केले नसेल तर ते लवकर करा. आयकर विभाग आपण केलेल्या दुर्लक्षामुळे १०,००० रुपये दंड आकारू शकतो. आयकर विभागाने (Income Tax Revenue) नागरिकांना पॅन कार्ड आधार कार्डशी जोडण्याची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत निश्चित केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पॅनकार्डला आधारशी जोडले गेले नाही तर त्यांना आयकर कायद्यानुसार निष्क्रिय मानले जाईल, असे या प्रकरणाशी संबंधित तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच आयकर विभागाने बजावले आहे, पॅनकार्डांना आधारशी न जोडल्याबद्दल अधिनियमांतर्गत कारवाई केली जाऊ शकते. याबाबत आयकर प्राप्तिकर विभागाने अधिसूचित केले आहे.


दुसर्‍या एका अधिकाऱ्यांनी सांगितले, जेव्हा पॅनकार्ड निष्क्रिय केले जाते तेव्हा समजते की त्यासंबंधित माहिती सरकारला दिली गेलेली नाही. आयकर विभाग अशा कार्डधारकांवर विद्यमान कायद्याच्या कलम २७२ बी अंतर्गत कारवाई करू शकते. आयकरकरदात्यांना १०,००० रुपयांपर्यंत दंडही आकारला जाऊ शकतो.


तथापि, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्या जे लोक पॅनकार्डसह आधार कार्ड लिंक करीत नाहीत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. प्राप्तिकर भरणाऱ्यांची अचूक ओळख आणि आर्थिक व्यवहाराची योग्य माहितीसाठीच दोन्ही कार्डे जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


0