नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही नेत्यांची दबंगिरी पाहिली असेल किंवा त्याचे किस्से ऐकले असतील. मात्र, आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका राजकारणी महिलेनेच एका अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचं दिसत आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यातील करंजिया पंजायतीत हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी एका महिला राजकारणीने सरकारी अधिकाऱ्याची कॉलर पकडून त्याच्या कानशिलात लगावली.


मिळालेल्या माहितीनुसार, महिला राजकारणी रंजीता परस्ते या डिंडोरी जिल्ह्याच्या करंजिया पंचायतीच्या माजी अध्यक्षा आहेत. डिंडोरी जिल्ह्यात मुख्यमंत्री जन कल्याण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात रंजीता यांनी पंचायतीचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) आर. के. पालनपुरे यांच्यावर हल्ला चढवला. तसेच त्यांची कॉलर पकडून स्टेजवरुन खाली खेचण्याचा प्रयत्न केला.



कार्यक्रमस्थळी शेकडो नागरिक उपस्थित होते. रंजीता यांचा राग नेमक्या कुठल्या कारणावरुन होता हे अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र, सत्तेची नशा राजकारण्यांना कुठल्या थरावर नेऊन ठेवते हे पुन्हा एकदा पहायला मिळालं आहे.