...आणि पोलीस स्टेशनमध्ये पार पडलं लग्न (व्हिडिओ)
लग्नमंडप, लग्नाचा हॉल किंवा मंदिरात लग्नसोहळा पार पडल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल. शाही लग्नसोहळा झाल्यामुळे अनेक लग्न चर्चेत असतात. मात्र, सध्या एक लग्नसोहळा वेगळ्याचा कारणामुळे चर्चेत आहे.
नवी दिल्ली : लग्नमंडप, लग्नाचा हॉल किंवा मंदिरात लग्नसोहळा पार पडल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं असेल. शाही लग्नसोहळा झाल्यामुळे अनेक लग्न चर्चेत असतात. मात्र, सध्या एक लग्नसोहळा वेगळ्याचा कारणामुळे चर्चेत आहे.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
लग्नसोहळा म्हटलं की वऱ्हाडी मंडळी नवनवीन कपडे, सूटबूट परिधान करुन उपस्थित राहतात. सर्वत्र आनंदाच्या वातावरण असताना अचानक पोलीस दाखल झाले तर...
आश्चर्य वाटतयं ना? पण हे खरं आहे. उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात असाच एक प्रकार पहायला मिळाला. जेथे चक्क पोलीस स्टेशनमध्ये लग्नसोहळा पार पडला. पाहूयात काय आहे हा प्रकार...
कन्नौज जिल्ह्यातील छिबरामऊ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात अनूप नावाच्या तरुणाचं लग्न होतं. लग्नसोहळ्यासाठी वधू पक्षाचे लोक लग्नमंडपात दाखल झाले. वधू प्रियंका लग्नसोहळा पार पडण्याची वाट पाहत होती.
मात्र, लग्नसोहळा सुरु होण्यापूर्वी लहान मुलांची काही विषयावरुन भांडण झाली. हा वाद इतका वाढला की, नवरदेवाच्या एका नातेवाईकाने चक्क वधूच्या आत्याला मारहाण केली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला.
दोन्ही पक्षातील नागरिकांना समजविण्यासाठी गावातील वरिष्ठ नागरिकांनी मध्यस्थी केली मात्र, काही उपयोग झाला नाही. मग, घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं.
अखेर पोलिसांनी नवरदेव आणि नवरीला घेऊन पोलीस स्टेशन गाठलं आणि त्याच ठिकाणी लग्नही लावून दिलं.