नवी दिल्ली : भाजप नेता आणि त्याच्या मुलाची गुंडगिरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दोघेही टोल कर्मचाऱ्याला मारहाण करत असल्याचं दिसत आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील अकबरपूर टोल नाक्यावर हा प्रकार घडला आहे. ज्या भाजप नेत्यावर आणि त्याच्या मुलावर मारहाणीचा आरोप करण्यात येत आहे ते कानपूरमधील भाजप जिल्हा अध्यक्ष असल्याचं बोललं जात आहे.


घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद


मिळालेल्या माहितीनुसार, राहुलदेव अग्निहोत्री आणि त्याचा मुलाने एका टोल कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.


... म्हणून केली मारहाण


एनएनआय न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप नेता आणि त्याच्या मुलाने टोल कर्मचाऱ्याला मारहाण केली कारण त्याने टोल न देता गाडी सोडण्यास मज्जाव केला.



ही घटना २८ फेब्रुवारी रोजी घडली आहे. व्हिडिओत दिसत आहे की, भाजप नेता राहुलदेव अग्निहोत्री आपल्या समर्थकांसोबत टोल कर्मचाऱ्याला मारहाण करत आहेत.