नवी दिल्ली : नेता असो किंवा कार्यकर्ता पोलीस नेहमीच त्यांच्या सुरक्षेसाठी असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. मात्र, आता एक असा व्हिडिओ समोर आला आहे जो पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.


(व्हिडिओ पाहण्सासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप नेता ज्योती मिश्रा आणि पोलीस कॉन्स्टेबल विपिन यांनी कानशिलात लगावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीत ही घटना घडली आहे.


न्यूज एजन्सी एएनआयने हा व्हिडिओ प्रसारित केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल आधी भाजप नेत्याच्या कानशिलात लगावत असल्याचं दिसत आहे.


नागरिकांनी केली पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण


व्हिडिओत दिसत आहे की, कॉन्स्टेबलने कानशिलात लगावल्यानंतर ज्योति मिश्राही त्याला धक्का देताना दिसत आहे. कॉन्स्टेबलला धक्का देताच तेथे उपस्थित नागरिकांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.



ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.या प्रकरणी ज्योती आणि विपिन यांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.