VIDEO : महात्मा गांधी यांचं आवडतं भजन गाण्यासाठी एकत्र आले १२४ देश
१२४ देशांतील कलाकारांची स्वरसाधना
मुंबई: 'वैष्णव जन तो....' या अतिशय समुधूर आणि तितक्याच समर्पक ओळी असणाऱ्या भजनाला स्वरबद्ध करण्यासाठी एकूण १२४ देशांतील कलाकारांनी स्वरसाधना केली आहे. गांधीजींच्या १४९ व्या जयंतीनिमित्त हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला.
गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेत हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला.
या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, उमा भारती व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुनही हा व्हिडिओ शेअर करत गांधीजींच्या या आवडच्या भजनाने एक प्रकारे साऱ्या जगालाच एकत्र आणल्याची भावना व्यक्त केली.
'पीटीआय'च्या वृत्तानुसार अर्मेनियापासून ते अंगोलापर्यंत आणि श्रीलंकेपासून ते सर्बियापर्यंतच्या स्थानिक कलाकारांनी आणि काही गटांनी एकत्र येत हे भजन गात आपली कला सादर केली आहे.