Crime News: चोरी करण्यासाठी लोकं काहीही करु शकतात. चोऱ्या करण्याच्या वेगवेगळ्या कल्पना देखील ते शोधून काढतात. पण किती पळाला तरी पोलिसांच्या हाती एक दिवस लागतोच. असाच एक प्रकार पुढे आला आहे. एसबीआय बँकेच्या एटीएममधून पैसे चोरण्यासाठी चोरट्यांनी चक्क यूट्यूबची मदत घेतली. 31 ऑक्टोबर रोजी रात्री 2 ते 4 वाजेच्या दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील एटीएम मशीन कापून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना पकडण्यासाठी जवळपास 200 हून अधिक सीसीटीव्ही तपासल्या तसेच या भागातील गॅस कटर वापरणाऱ्यांची चौकशी केली गेली. त्यानंतर आरोपी विजय दास हा पोलिसांच्या हाती लागला. तो टीव्हीएस शोरूममध्ये काम करतो.


पोलिसांच्या चौकशीदरम्यान विजयने चोरीची माहिती दिली. एटीएममध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने गॅस कटरचा वापर केल्याचे विजयने मान्य केले. बिहारमधील एक घटना पाहिल्यानंतर त्यांनी पैसे मिळण्यासाठी हा कट रचला. यासाठी त्यांनी युट्यूबवरून एटीएम कसे कापायचे हे पाहिलं. त्यानंतर आरोपींनी फ्लिपकार्टवरून गॅस कटर आणि ऑक्सिजन रेग्युलेटर ऑनलाइन मागवला.


दोन आरोपी गॅस सिलिंडर घेऊन एटीएममध्ये शिरले आणि एटीएम कापण्यास सुरुवात केली. एटीएम कापताना आग लागल्याने विजय दास देखील एटीएमच्या आत गेला, एटीएमच्या आत आग लागल्यानंतर ते गॅस सिलिंडर घेऊन फरार झाले.