हैदराबाद: वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही वर्षांपूर्वी अकबरुद्दीन यांनी हिंदू समाजाला उद्देशून चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, भारतात १०० कोटी हिंदू आहेत आणि २५ कोटी मुसलमान आहेत. १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा. मग कोणामध्ये किती दम आहे हे दिसेल, असे ओवेसींनी म्हटले होते. यावरून बराच गदारोळही निर्माण झाला होता. 


जय श्रीराम आणि मॉब लिंचिंग विरुद्ध ४९ सेलिब्रिटींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र


यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा अकबरुद्दीन यांनी या वादावरची खपली काढली. ते हैदराबाद येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. 



जे लोक घाबरतात त्यांनाच घाबरवले जाते. तर ज्या व्यक्तीला इतरांना धाक कसा दाखवायचा हे माहिती असते, लोक त्याला वचकून असतात. 


आज अनेकजण माझा द्वेष का करतात? कारण, १५ मिनिटांचे वक्तव्य त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. ही जखम अजूनही भरून निघालेली नाही, असे ओवेसी यांनी म्हटले.  


'फाळणीच्यावेळी मुस्लिम पाकिस्तानात गेले असते तर हे दिवस पाहायला लागले नसते'


तसेच मुसलमानांनी वाघासारखे शूर व्हावे जेणेकरून कुठलाही चायवाला त्यांच्यासमोर उभा राहू शकणार नाही. देशात मॉब लिचिंगसारखे प्रकार घडत आहेत. मात्र, त्यामुळे घाबरून जाऊ नका. तुमच्यासमोर कुठलीही घोषणाबाजी झाली तरी तुम्ही केवळ अल्लाचे नाव घ्या, असे आवाहन ओवेसी यांनी केले.