नवी दिल्ली : शारिरीक आणि शाब्दिक हिंसाचारापासून देशवासियांनी मुक्त व्हावं, असं आवाहन मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलंय. त्यांनी आज राष्ट्रपती म्हणून राष्ट्राला उद्देशून अखेरचा संदेश दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्या रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदी शपथविधी होणार आहे. सहिष्णुता हा आपल्या देशाचा पाया असल्याचं मुखर्जी म्हणाले. आपल्याभोवती हिंसा वाढत असल्याचं आपण बघतोय. या हिंसेच्या मुळाशी भय आणि अविश्वास आहे. यापासून देशवासियांनी मुक्त झालं पाहिजे, असं प्रणवदा म्हणाले.


दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या हस्ते राष्ट्रपतींच्या निवडक भाषणांच्या संग्रहाचं नवी दिल्लीत प्रकाशन झालं. भविष्यातही मुखर्जी आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.