नवी दिल्ली : Mask mandatory again: Amid rising Covid-19 cases, Rs 500 fine for not wearing facemasks : भारतातून कोरोना गेला असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. कारण कोणीही मास्क घालताना दिसत नाही. मात्र, याला काही लोक अपवाद आहेत. कोरोचा धोका अद्याप संपलेला नाही. पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. दिल्लीत कोरोनाचे जास्त रुग्ण आढळून आल्याने सरकारने दिल्लीत मास्क आता बंधनकारक करण्यात आले आहे.


दिल्लीत मास्क घालणे अनिवार्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाची राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यासोबतच मृतांचा आकडाही वाढत आहे. हे पाहता दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता दिल्लीत मास्क न घातल्यास 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.


दिल्लीत तसेच संपूर्ण देशात कोविड-19 चे रुग्णांत पुन्हा वाढत आहेत. काही महिन्यांपूर्वी कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर, दिल्लीमध्ये कोरोनाव्हायरसच्या  रुग्णांमध्ये आणखी एक धोकादायक वाढ दिसून येत आहे, ज्यामुळे चौथ्या कोविड -19 लाटेची भीती निर्माण झाली आहे.


दिल्लीत कोविड-19 रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे राजधानीतील अधिकाऱ्यांनी शहरात मास्कचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत विषाणूची 2,100 हून अधिक नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.


दक्षिण दिल्लीच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या नोटीसनुसार, सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आता बंधनकारक आहे आणि अशा भागात मास्कशिवाय दिसणार्‍यांना 500 रुपये दंड आकारला जाईल.


गेल्या पंधरवड्यात, दिल्लीतील कोविड-19 पॉझिटिव्ह दरात अचानक वाढ झाली आहे आणि त्यामुळे दिल्लीतील अधिकाऱ्यांनी नवीन निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली एडीएमने जारी केलेल्या सूचनेनुसार, सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालण्याबाबत एक नियम केला आहे. हा नियम तोडणाऱ्यांना आता 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.