Weather Update : अचानक हवामानात बदल, येथे गडगडाटासह जोरदार पाऊस
अचानक हवामान (Weather ) बदल झाल्याने दिल्लीत ढगांचे सावट दिसून आले. पुन्हा एकदा देशाची राजधानी दिल्लीत गडगडाटासह जोरदार पाऊस (Rain) झाला.
नवी दिल्ली : अचानक हवामान (Weather ) बदल झाल्याने दिल्लीत ढगांचे सावट दिसून आले. पुन्हा एकदा देशाची राजधानी दिल्लीत गडगडाटासह जोरदार पाऊस (Rain) झाला. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR Rain) परिसरात गडगडाटाने अनाचक पावसाला सुरुवात झाली. दिल्लीच्या व्यतिरिक्त, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्रामसह अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. अचानक हवामानामुळे दिल्ली-एनसीआरच्या बऱ्याच भागात अंधार दाटला होता. कोळोखामुळे वाहनचालकांनी गाडीचे दिवे लावले होते.
पावसाच्या आधी विक्रमी तापमान
दिल्लीत प्रचंड उकाडा वाढला आहे. पाऊस पडण्याच्या आधी विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये रेकॉर्डब्रेक तापमान नोंदवले गेले. गुरुवारी (11 मार्च) गेल्या नऊ वर्षांत सर्वात जास्त तापमान नोंदविले गेले. तापमानाने 35 अंश सेल्सिअसचा आकडा पार केला होता. दरम्यान, पाऊस झाल्यानंतर, तापमान रेकॉर्ड केले गेले आहे आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअस रेकॉर्ड केले गेले.
पावसाची पुन्हा शक्यता
दिल्लीत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे. दिवसाही पावसाची शक्यता असल्याचे हवामाना विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिल्ली-एनसीआर पावसासोबत गारा पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी रात्री वाऱ्यासह दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात हलक्या पाऊस झाला.