नवी दिल्ली :  नुकतेच अरबी समुद्रात येऊन गेलेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातच्या किनारपट्टीवर मोठे नुकसान केले आहे. हे वादळ शमते तोवर आणखी एक वादळ भारताच्या उंभरठ्यावर येऊन ठेपले आहे. उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या पूर्व मध्य खाडीमध्ये 22 मे रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळाची मोठ्या प्रलयकारी वादळात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. बुधवारी IMDने ही माहिती दिली आहे. हवामान विज्ञान विभागाचे क्षेत्रिय निर्देशक जी के दास यांनी म्हटले आहे की, वायव्येकडे हे वादळ सरकू शकते. 26 मे रोजी सायंकाळपर्यंत हे वादळ प.बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकू शकतं. यावेळी वाऱ्याचा वेग तीव्र  असण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 मे रोजी तयार होणारा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 72 तासात चक्रीवादळाची निर्मिती होऊ शकते. पच्छिम तटावर 25 मे पासून मध्यम ते अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु 26 मे रोजी वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.या चक्रीवादळाचे नाव यश असे असणार आहे.


नुकत्याच येऊन गेलेल्या, तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीवर मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विजांच्या खांबांसह अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. चक्रीवादळादरम्यान 13 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.