Weather Update: हवामानात मोठा बदल, `या` राज्यांमध्ये 4 दिवस पावसाची शक्यता, IMD ने दिला इशारा
IMD Rainfall Alert: हवामानात सातत्याने बदल दिसून येत आहे. पुढील चार दिवस हवामानात पुन्हा मोठा बदल दिसणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांत हवामानात बदल होण्याचा अंदाज वर्तवला आहे असून पावसाचा इशारा दिला आहे. या बदलानंतर थंडीचा पुन्हा जोर वाढू शकतो.
Weather Forecast 13 February 2023 : उत्तर भारतात काही ठिकाणी थंडीची लाट कायम आहे. दरम्यान, पहाडी भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात आणखी तीन ते चार अंशांची घट नोंदवण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. पावसानंतर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. तसेच डोंगर भागातील राज्यांमध्ये हिमवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.
या राज्यांमध्ये पाऊस पडेल
पुढील चार दिवसापासून हवामानात बदल होणार असून हवामान खात्याने (IMD) अरुणाचल प्रदेशात 16 फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. (Rainfall Alert) याशिवाय पूर्व आसाममध्येही पावसाचा अंदाज IMDने वर्तवला आहे. तसेच काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. या भागात पावसाव्यतिरिक्त जोरदार वारेही वाहू शकतात, त्यामुळे मैदानी भागात तापमानात घट होऊ शकते. थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पंजाब आणि हरियाणामध्ये थंडी कायम
पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागात थंडी कायम आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील अमृतसर येथे 6.6 अंश सेल्सिअस, लुधियाना 8.9 अंश सेल्सिअस, पटियाला 8.8 अंश सेल्सिअस, पठाणकोट 6 अंश सेल्सिअस, भटिंडा 4.4 अंश सेल्सिअस, फरिदकोट 08 अंश सेल्सिअस आणि फरिदकोट 08 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सेल्सिअस नोंदवले गेले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणातील अंबाला येथे किमान तापमान 11 अंश सेल्सिअस तर हिसार येथे किमान तापमान 12.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर नारनौल, रोहतक, भिवानी आणि सिरसा येथे किमान तापमान अनुक्रमे 8.4 अंश सेल्सिअस, 8.6 अंश सेल्सिअस, 13 अंश सेल्सिअस आणि सहा अंश सेल्सिअस होते. चंदीगडमध्ये 9.6 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा दोन अंशांनी जास्त आहे.
दिल्लीतून थंडी गायब
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत शनिवारी तामनात वाढ झालेली दिसून आली. दिल्लीतील थंडी गायब झाली असून पारा 27.7 अंश सेल्सिअस नोंदला गेला, जो सामान्यपेक्षा पाच अंशांनी जास्त होता. मात्र, डोंगरावर बर्फवृष्टी आणि पावसामुळे तापमानात घट झाली असून लोकांना थंडी जाणवू लागली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले की, आजही ताशी 35 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागतील आणि त्यामुळे तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. मात्र, मंगळवारपासून तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.