मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारा हवामानातील बदल पुढेही कायम राहणार आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशातील बहुतांश राज्यांमध्ये तापमान आणखी खाली जाणार असून शीतलहरीचा कहर अधिक तीव्र होणाना दिसणार आहे. याचे थेट परिणाम महाराष्ट्र आणि मुंबईतही दिसणार आहेत. पंजाब, हरियाणा, चंदीगढ, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांमध्ये तापमान पुन्हा एकदा निच्चांक गाठणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त शीतलहरीच नव्हे तर, या भागांमध्ये धुरक्याचं प्रमाणही वाढणार आहे. याशिवाय नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा अशा भागांमध्ये पर्जन्यमानही वर्तवण्यात आलं आहे. तर, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता नोंदवण्यात आली आहे. 



हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या वृत्तानुसार दिल्लीत पुन्हा एकदा पारा खाली जाणार आहे. दिल्लीमध्ये येत्या काही दिवसांसाठी सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात धुरकं असेल. ज्याचा परिणाम वाहतुकीवर होऊ शकतो. संध्याकाळच्या वेळी तापमानात लक्षणीय घट पाहायला मिळणार असल्यामुळे दिल्ली आणि पर्यायी संपूर्ण देश पुन्हा गारठणार हे खरं. 


उत्तर भारतात आलेली शीतलहर पाहता बहुतांश ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून प्रवासी आणि नागरिकांना सावधगिरीचा इशाराही देण्यात आला आहे. शिवाय संकटसमयी आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रशासन यंत्रणांनीही पूर्ण तयारी ठेवली आहे. 


.