Weather Forecast : देशात थंडीचा लाट आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी तापमान (Weather) शून्याच्याखाली गेले आहे. मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. (Maharashtra Weather Updates) राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. (Weather News in Marathi) थंडीपासून बचावासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. तर दुसरीकडे कडाक्याच्या थंडीत देशातील काही शहरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Weather Latest Marathi News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण उत्तर भारतात ढगाळ वातावरण असणार आहे आणि पुढील आठवड्यात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Weather Update) त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावरही पावसाचे सावट आहे.  तसेच लोकांना गोठवणाऱ्या थंडीपासून थोडासा दिलासा मिळू शकतो. हवामान खात्याचे म्हणणे आहे की वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे उंच डोंगराळ भागातून मैदानी भागाकडे वाहणारे बर्फाचे वारे थांबले आहेत, त्यामुळे या भागात हवामानाच्या तापमानातही किंचित वाढ झाली आहे.  


हवामानाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात थंडीचा कालावधी कमी आहे. पण तरी देखील मुंबई, कोकण, खान्देश, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद आणि अहमनगर या जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडल्याचे पाहायला मिळालं. ही थंडी कमी होण्यासाठी आणखी 5 दिवसांचा कालावधी लागणारे आहे.


26 जानेवारीला असेच हवामान असेल


हवामान खात्यानुसार (Weather Update) पुढील आठवड्यात दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही थंड वारे वाहू शकतात. अंदाजानुसार, पावसाचा हा टप्पा 24 ते जानेवारीपर्यंत राहील. 23 जानेवारी रोजी दिल्ली-एनसीआर, चंदीगड आणि हरियाणाच्या अनेक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच या वेळी 24 जानेवारीला ढगांचे आच्छादन असणार आहे.


IMD नुसार, हा वेस्टर्न डिस्टर्बन्स 20 जानेवारी ते 26 जानेवारीच्या रात्रीपर्यंत सक्रिय राहील. त्याचा परिणाम मैदानी प्रदेशात तसेच उंच डोंगराळ भागात दिसून येईल. 20 ते 22 जानेवारी दरम्यान लडाख, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.  


दिवस-रात्र कमाल तापमानात होईल वाढ 


हवामान खात्याने (Weather Update)सांगितले की, शनिवारी म्हणजेच 21 जानेवारीला लोकांना थंडीपासून दिलासा मिळेल आणि हवामान स्वच्छ राहील. सूर्यप्रकाशामुळे दिवसाचे कमाल तापमान 23 आणि किमान तापमान 10 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे थंडीपासून थोडासा दिलासा मिळेल.