Weather Update: हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या बहुतांश मैदानी भागांमध्ये किमान पुढील चार दिवस शीतलहरीचा कहर पाहायला मिळेल. (Himachal Pradesh) हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर (Jammu Kashmir), पंजाब (Punjab) या भागांमध्ये थंडीचा कडाका वाढण्यासोबतच धुक्याचंही प्रमाण जास्त असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचे थेट परिणाम रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर होणार आहेत. एकिकडे देशात तापमान लक्षणीय फरकानं कमी होत असतानाच दुसरीकडे दिल्ली, पंजाब, हरियाणा या भागांमध्ये अवेळी पावसाच्या सरी बसरणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.


हेसुद्धा वाचा : Bus Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस झाली पलटी; भीषण अपघाताचा Video समोर!


 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढच्या चार दिवसांमध्ये पश्चिम भारतामध्ये थंडीचं प्रमाण काही अंशी कमी झालेलं असेल. तर, अवेळी पावसाच्या सरी बरसणार असल्यामुळं इथे रात्रीच्या वेळई हवेतील गारवा वाढू शकतो. आयएमडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशात यंदाच्या वर्षी गेल्या चार वर्षांतील सर्वाधिक धुकं पाहायला मिळालं आहे. इथं दिल्लीतच तापमानानं 2 अंशांखाली येत एक नवा विक्रम रचला. तर, अनेकांनीच देशाच्या अती उत्तरेकडे नेमकी काय परिस्थिती असेल याचाच विचार करण्यास सुरुवात केली. 


पर्वतीय भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी 


बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या भागांमध्ये येत्या 24 तासांत धुक्याचं प्रमाण अधिक असेल. इतकंच नव्हे तर, इथं तापमानातही मोठी घट होणार असल्यामुळं हवामान खात्यानं बिहार आणि नजीकच्या भागांसाठी ऑरेंज अलर्ट लागू केला आहे. दरम्यान,  (Uttarakhand) उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, (Assam) आसाम, त्रिपुरा, (Meghalay) मेघालय या भागांमध्येही नागरिकांना अती थंड वातावरणामुळं काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तर, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशातील स्पितीचं खोरं, उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये (Sikkim) जोरदार बर्फवृष्टी होणार आहे. 


महाराष्ट्रासाठी पुढचे तीन दिवस महत्त्वाचे (Maharashtra Weather Update)


महाराष्ट्रात औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. परिणामस्वरुप (Mumbai Temprature) मुंबईतही हुडहुडी जाणवणार आहे. 11 ते 14 जानेवारी या दिवसांमध्ये महाराष्ट्रातही शीतलहर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


काही ठिकाणी कडाक्याचं ऊन, पिकांना फटका 


यंदाच्या वर्षी महाराष्ट्र गारठला अला तरीही काही भागांमध्ये मात्र थंडीचं प्रमाण अपेक्षेहून कमीच आहे. काही फरकानं जास्त असणाऱ्या तापमानाचा फटका गहू पिकाला बसला आहे. पिकाच्या ओंब्यांची वाढ खुंटली आहे. इतकंच नव्हे, तर काही ठिकाणी ज्वारी पिकाची कणसंही काळी पडू लागली आहेत. त्यामुळं यंदाच्या वर्षीचा हिवाळा रडवत आहे, असं म्हणायला हरकत नाही.