Tulsi Vivah  Card :  लग्न म्हटलं तर पत्रिका (Wedding card) तर हवीचं. कार्तिकी एकादशी झाल्यानंतर सर्वत्र तुळशी विवाह (tulsi vivah) संपन्न होतात. त्यामुळे तुळशी विवाहापूर्वी सोशल मीडियावर तुळशीच्या लग्नाची पत्रिका तुफान व्हायरल होत आहे. पत्रिकेमध्ये लिहिल्याप्रमाणे मुलीचं नाव तुळशी (Tulasi) असून नवऱ्यामुलाचं विष्णू (vishnu) असं आहे. दोघांचा विवाह शनिवारी संध्याकाळी 8 वाजल्यापासून पुढे शुभ मुहूर्तावर संपन्न होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुळशी लग्नाची पत्रिका
लग्न म्हटलं तर भोजनाची काय सोय असणार आहे? हे जाणुन घेण्यासाठी देखील नातेवाईक उत्सुक असतात. म्हणून तुळशी आणि विष्णू यांच्या विवाह सोहळ्यात भोजनाची सोय आपआपल्या घरी आणि सोईनुसार करण्यात आली आहे. 


पाहा तुळशी आणि विष्णूच्या विवाहाची पत्रिका... (Tulsi Vivah  Card)




तुळशी आणि विष्णूच्या विवाह पत्रिकेत नातेवाईकांसाठी सूचना देखील आहे. लग्न लावायच्या आधी कोणी फटाके वाजवू नये... असं पत्रिकेत लिहिलं आहे. सध्या तुळशी आणि विष्णूची लग्न पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


दिवाळी उत्साहानंतर तुळशी विवाह
सांगायचं झालं तर, दिवाळीच्या (diwali) पाच दिवसांच्या उत्सवानंतर सर्वाना प्रतीक्षा असते ती तुळशीच्या लग्नाची. आज आनेकांच्या घरी तुळशीच्या विवाहाची उत्सुकता असेल. म्हणून आता अनेक व्हट्सअ‍ॅप ग्रूपवर तुळशी विवाहाची पत्रिका आली असेल.