Wedding Gift: वधूच्या भावाने लग्नात दिली अनोखी भेट, स्वर्गवासी वडिलांना आणलं परत!
काही जण या जगातच नसल्याने परत येऊच शकत नाहीत. अशा जवळच्या व्यक्तीची नातेवाईकांना आठवण काढण्याशिवाय पर्याय उरत नाही.
Trending Father's Wax Statue: लग्न म्हटलं की आनंद सोहळा असतो. या सोहळ्यानिमित्त नातेवाईक एकत्र येतात. गप्पा, मौजमजा आणि नाच-गाणी मात्र अनेकदा काही जवळचे नातेवाईक या सोहळ्याला उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजेरी लावतात. मात्र असं असलं तरी काही जण या जगातच नसल्याने परत येऊच शकत नाहीत. अशा जवळच्या व्यक्तीची नातेवाईकांना आठवण काढण्याशिवाय पर्याय उरत नाही. तामिळनाडूतील एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भावाने बहिणीच्या खास दिवसासाठी एक अतिशय सुंदर सरप्राईज प्लॅन केला.
वधूच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नात वधूला तिच्या वडिलांची उणीव भासत असावी हे उघड आहे. पण त्याच्या भावाने ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न केला आणि वडिलांसारखी मेणाचा पुतळा या कार्यक्रमात आणला.
वडिलांचा मेणाचा पुतळा पाहताच वधू भावूक झाली आणि रडू लागली. व्हिडीओमध्ये वधू आणि वधूच्या आईसह काही नातेवाईकांचे डोळेही पाणावले. या व्हिडीओमध्ये वधूने वडिलांच्या पुतळ्याला मिठी मारली. या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ वेगाने पसरत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. कमेंट सेक्शनमध्ये यूजर्स त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसले.