कमाल माझ्या बायकोची; भर मंडपात नवरदेवाला नवरीबाई वाचवते तेव्हा... Video Viral
ही अॅक्शन आतापर्यंत तुम्ही पाहिली नसेल, तर लगेच पाहा.
मुंबई : लग्नसमारंभ कोणा एका चित्रपटाहून कमी नसतात. इथं भावना असतात, अॅक्शन असते, उत्साह असतो आणि हो ड्रामाही असतोच असतो. आता विषय अॅक्शनचाच निघाला आहे, तर सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओबद्दल बोलावंच लागेल. कारण, ही अॅक्शन आतापर्यंत तुम्ही पाहिली नसेल, तर लगेच पाहा.
लग्नाचे असंख्य व्हिडीओ हल्ली व्हायरल होत असतात. त्यापैकीच हा एक व्हिडीओ.
जिथं, नवरा-नवरी एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. तेव्हात नवरदेव काहीसा डगमगतो.
तो इतका बिथरतो की, आता खाली पडेल की काय असंच वाटतं. पण, तितक्यातच नवरीबाई त्याला घट्ट पकडते.
कोणत्या चित्रपटामध्ये हा प्रसंग असता, तर तिथे दिग्दर्शकानं नक्कीच एखादं गाणं, मंद वारा असं काहीतरी जोडलं असतं यात शंका नाही.
खोटं वाटतंय का, मग हा व्हिडीओ नक्की पाहा.
नवरदेवासाठी नवरीनं केलेले हे प्रयत्न म्हणजे लग्नाला मिळालेला एक खास टच आणि आयुष्यभराची आठवण, नाही का...
बरं इथे दुसरा मुद्दा असा की, लग्नामध्ये काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने आपण बऱ्याच संकल्पना अंमलात आणत असतो.
पण, त्याची पूर्वतयारी आणि पूर्वकल्पना आपल्या जोडीदाराला दिली म्हणजे पुढचा धोका किमान टळतो. तेव्हा तुम्ही असं काही करण्याच्या बेतात असाल, तर आधीच तयारी करा.
Thank Us Later...