Wedding Video: लग्नानंतर वर-वधूला पाहून तुम्ही म्हणाल `नजर हटी दुर्घटना घटी`... पाहा व्हायरल व्हिडीओ
लग्न म्हटलं की, महागड्या वस्तू, दागिने, पैसे हे सगळं असतंच. त्यामुळे लग्नात चोरी झालीं म्हटलं की, तुम्हाला असेच वाटेल की, यापैकी काहीतरी चोरीला गेलं असावं.
मुंबई :सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरु आहे. सोशल मीडिया तुम्ही ओपन केलात तर तुम्हाला प्रत्येक 4 व्हिडीओनंतर एक लग्नाचा व्हिडीओ पाहायला मिळेल. हा व्हिडीओ कधी लग्नातील विधींचा असतो तर काधी काही मजा मस्करीचा असतो. असे लग्नातील व्हिडीओ पाहून आपले देखील मनोरंजन होते. म्हणून लोक अशा व्हिडीओंना आवर्जून पाहातात. सोशल मीडियावर सध्या लग्नातील एका चोरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तसे पाहाता लग्न म्हटलं की, महागड्या वस्तू, दागिने, पैसे हे सगळं असतंच. त्यामुळे लग्नात चोरी झालीं म्हटलं की, तुम्हाला असेच वाटेल की, यापैकी काहीतरी चोरीला गेलं असावं. परंतु असे नाही.
तुम्हाला लग्नात चोरीला गेलेली गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल. कारण लग्नात चक्कं पापडांची चोरी झाली आणि ही चोरी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर ती नवरा नवरीनं केली.
हो, तुम्ही बरोबर ऐकलात. लग्नात नवरा-नवरीने पापडाची चोरी केली. खरेतर लग्नात नवरा-नवरी हे लग्नाचे मुख्य आकर्षक असतात. त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष त्यांच्याकडे असतं. यामुळेच हे नवरा-नवरी पापडाची चोरी करताना पकडले गेले आहेत.
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, लग्नात नवरा-नवरी बाजू-बाजूला जेवायल बसलेले आहेत. तेव्हा नवऱ्याचं लक्ष नसताना नवरी त्याच्या ताटातून हळूच पापड चोरुन खाते. थोड्या वेळाने जेव्हा नवरा ताटात पाहतो तेव्हा त्याचा पापड ताटातून गायब झाला असल्याचे कळते. तो जेव्हा नवरीकडे पाहातो तेव्हा ती त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आपली मान वळवते. याच संधीचा फायदा घेऊन नवरा नवरीच्या ताटातील पापड उचलतो आणि आपल्या ताटात ठेवतो.
हा व्हिडीओ खरोखरंचं खूप सुंदर आहे. यामध्ये या नववधू आणि नवरदेवाची जोडी फारच सुंदर आणि एकमेकांना साजेशी आहे. यामुळेच सोशल मीडियावर देखील या जोडीला आणि या व्हिडीओला लोकांनी खूप पसंती दर्शवली आहे.
लोकांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि शेअर्सचा पाऊस पाडला आहे. लोकं या जोडप्यांच प्रेम पाहून स्वत:ला या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाईक्स करण्यापासून रोखू शकत नाहीत.