मुंबई : सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे ज्यावर आपल्याला सगळ्या गोष्टीची माहिती मिळते. सोशल मीडियामुळे आपल्याला राजकारणापासून ते अगदी बॉलीवूडपर्यंत सगळ्याच गोष्टीची माहिती मिळते. सोशल मीडियावर आपले मनोरंजन देखील होते, त्याचबरोबोर सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म देखील आहे जेथे आपल्याला नवीन नवीन मित्र देखील भेटतात. ज्यामुळे सगळेच तरुण मंडळी सध्या सोशल मीडियावर असल्याचे आपल्याला पाहायला मिळाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेस सध्या लग्नाचा सिझन असल्याने सोशल मीडियावर आपल्याला लग्नाचेच फोटो किंवा व्हिडीओ पाहायला मिळतात, हे व्हिडीओ खूपच मजेदार असतात. यांपैकी बहुतेक व्हिडीओ हे नववधू आणि नवरदेवाचे असतात.


जवळ-जवळ सगळ्याच लग्नात असं काहीतरी घडतं ज्यामुळे उपस्थीत सगळे जण त्याचा आनंद घेतात आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातुन बहुतांश लोकं असे व्हिडीओ शेअर करत असतात.


सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नववधू आणि नवरदेवाचा आहे. ज्यामध्ये या लग्नात कापला जाणाऱ्या केकची सर्वत्र चर्चा सुरू आहेय


खरेतर आता नवीन ट्रेंडनुसार लग्न झाल्यावर किंवा साखरपुड्यानंतर वधू-वराकडून केक कापला जातो. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये देखील नववधू आणि नवरदेव केक कापत आहेत. परंतु यांच्या लग्नाचा केक काहीसा वेगळा आहे. वेगळा यासाठी कारण हा केक लटकता केक आहे.


व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू-वरांना कापायाचा असलेला केक हंडीसारखा लटकवला गेला आहे, जो एका जागेवर न थांबता इकडून तिकडून हलत आहे. ज्यामुळे नववधू आणि नवरदेव हातात मोठी तलवार घेऊन केक कापण्याचा प्रयत्न करत आहेत.


वधू आणि वर एकमेकांच्या चेहऱ्याकडे पहात आहेत


स्टेजवर उभ्या असलेल्या वधू -वरांना केक कापता आला नाही. ते फक्त एकमेकांचे तोंड पाहून हसत होते. हा व्हिडीओ द चोप्रा इव्हेंट्स नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


लोकांकडून स्टेजवर मजा घेण्यात आली


स्टेवर वधू आणि नवरदेवाला केक कापता येत नव्हता, हे दृष्य पाहून स्टेजवर उपस्थीत सगळे लोकं त्यांच्या या परिस्थितीला पाहून हसत आहे. व्हिडीओच्या शेवटपर्यंत नववधू आणि नवरदेवाला हा केक कापता आला नाही.


सोशल मीडियावर देखील लोकांकडून या व्हिडीओची मजा घेतली जात आहे. लोकं जोरदार या व्हिडीओला शेअर करत आहेत.