मुंबई : आपल्याला नेहमी सोशल मीडियावरती काही ना काही फोटो किंवा व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यामुळे आपले मनोरंजन होते. हे व्हिडीओ कधी कोणाच्या फसवणूकीचे असतात तर कधी ते कधी एखाद्याच्या फजेतीचे असतात. तसेच सध्या सोशल मीडियावरती लग्नाचे देखील काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लोकं आपल्या लग्नातील प्रत्येक क्षण आठवणीत राहावा यासाठी त्याला कॅमेरात कैद करुन ठेवतात. परंतु काही जोडप्यांसोबत असा काही प्रकार घडतो जो, ते आयुष्यात कधीही विसरत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत देखील असंच काहीसं तुम्हाला पाहायला मिळत आहे. तुम्हाला हे माहितच आहे की, वधूला तिच्या लग्नाच्या दिवशी खूप आनंदाने तयार व्हायला आवडते. तिला तिचा पेहराव, हेअरस्टाईल, मेक-अप इत्यादी सर्व काही करायचे आहे, कारण तो दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. वधूचा हा सुंदर क्षण तिच्या संपूर्ण आयुष्य तिच्यासोबत राहणारा असतो आणि हे लक्षात ठेवून ती देखील आनंदी आहे.


मात्र, अनेक वेळा असंही घडतं की, सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी नववधू खूप मेकअप करून घेते, त्यामुळे अशा ओव्हर मेकअपमुळे नववधू चांगली दिसत नाही.


वराने वधूचा मेकअप काढल्यावर हा प्रकार घडला


लग्नात सर्व पाहुण्यांच्या नजरा फक्त वधू-वरावरच असतात. जेव्हा नववधू स्टेजवर येण्यासाठी एन्ट्री घेते तेव्हा लोक तिच्याकडे फक्त एकटक नजरेने पाहत असतात, एवढच काय तर वराची नजरही आपल्या वधूकडे असते.


कधी वर वधूला पाहून भावूक होतो, तर कधी तिच् सौंदर्य पाहून भान हरपून जातात. मात्र, इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये काहीतरी उलट दिसले. या व्हिडीओमध्ये, वर आपल्या वधूला घेऊन आपल्या घरी कारने जात आहे. परंतु वराने आपल्या वधूचा खरा चेहरा उघड केला आहे.


वधूचा खरा चेहरा समोर


वधू गाडीत झोपलेली असताना, वर आपल्या रुमालाने तिचा चेहरा पुसण्यास सुरुवात करतो. वराने वधूचा चेहरा पुसल्यानंतर, अर्धा चेहरा मेकअपसह असतो, तर अर्धा चेहरा मेकअपशिवाय असतो. नववधूचा हा खरा चेहरा कॅमेऱ्यासमोर येताच ती चांगली दिसत नाही. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


इंस्टाग्रामवरील व्हिडीओ लोकांना खूप आवडला


सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत. नेशन व्हिडीओ (nation.video) नावाच्या अकाऊंटने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करताच लोकांनी त्याला लाईक्स, कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'फुल मेकअप बाजी'. इतर अनेक वापरकर्त्यांनी देखील या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.