मुंबई : पूर्वीच्या काळातील नववधू आपल्या लग्नात लाजायच्या, लोकांची गर्दी पाहून बावरते परंतु आता जमाना बदलला आहे. आजकालच्या नववधू या फारच खूल्या विचाऱ्यांच्या आहेत. ज्यामुळे त्या लग्नात न लाजता, न बावरता आपल्या लग्नाचा पुरेपुर आनंद घेतात, त्या नाचतात काय, गाणं काय गातात, त्यांना ज्या गोष्टीनी आनंद मिळतो, त्या सगळ्या गोष्टी नववधू करतात. त्यात सोशल मीडियाची जोड असल्याने आपल्याला लग्नातील काही क्षण देखीस अनुभवायला मिळतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नात जेव्हा वधू एन्ट्री करते, तेव्हा लोक तिच्या लूकचे तिच्या कपड्यांचे कौतुक करतात. त्यामुळे नववधूचा लूक पाहून नवरदेवही बहुतेकदा आश्चर्यतकित होऊन नवववधूकडे पाहात स्तब्ध उभा राहतो. परंतु इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही खास आहे.


या व्हिडीओमध्ये नववधू आपल्या भावांसोबत लग्न मंडपात एन्ट्री करत आहे, तेव्हाच नववधूचे स्वागत करण्यासाठी नवरदेव सज्जं होतो. नववधूची एन्ट्री होतच नवरदेव आनंदात नाचू लागतो, जे पाहून नवरीला देखील आनंद होतो, ज्यामुळे ती नवरदेवा जवळ येऊन सगळ्या पाहूण्यांनसमोर मिठी मारते आणि त्यानंतर नववधू देखील त्याच्यासोबत नाचण्यास तयार होते.


नववधू आणि नवरदेवाची ही केमिस्ट्री लोकांना खूप आवडली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सोशल मीडियावर लोकांनी या व्हिडीओला उचलून धरले आहे आणि ते या जोडप्याचे कौतुक करत आहेत. thechopraevents नावाच्या अकाउंटद्वारे हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'शेवटपर्यंत बघा, वराने सर्वात सुंदर वधूचे स्वागत केले'.


हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्सने आपले मत या व्हिडीओवर व्यक्त केले आहे.