मुंबई : लग्न म्हटलं की, मजा मस्ती आलीच, प्रत्येक व्यक्ती लग्नात खूप मजा करतात. त्यात वरात म्हणजे सगळ्याचा आवडता विधी. लग्नाच्या वरातीमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकराचा डान्स आपल्याला पाहायला मिळतो ज्यामुळे आपल्याला आपले हसूच आवरत नाही. लोकं अशी एक एक स्टाईल आणि स्टेप घेऊन येतात की, बस रे बस... आता नवीन ट्रेंड नुसार नवरा नवरी सुद्धा आपल्या लग्नात डान्स करतात. ज्यामुळे ते चर्चेचा विषय बनताता. लग्नात नववधू आणि नवरदेव आकर्षनाचा केंद्र बिंदू असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमधील नववधू आणि नवरदेवासारखं आतापर्यंत कोणतही जोडपं नाचलं नसावं. तुम्हाला त्यांचा डान्स पाहून तुमचे हसू आवरणार नाही. एवढेच काय तर तुम्ही कधी अपेक्षा ही केली नसणार असा डान्स वधू आणि नवरदेवाकडून तुम्हाला पाहायला मिळेल.


लग्नाच्या निमित्ताने असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये असे दिसून येते की सुरूवातीला नवरदेव एका भलत्याच स्टाईलमध्ये डान्स करत आहे. परंतु खरी मजा तेव्हा सुरू होते जेव्हा वधू डान्स करायला लागते.


जर तुम्ही लग्नातील इतर व्हिडीओला कंटाळले असाल तरी हा व्हिडीओ तुम्ही पाहाच  हा व्हिडीओ तुम्हाला ताजेतवाणे केल्याशिवाय रहाणार नाही. इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की, हे लग्न भारताबाहेरील आहे जे देसी स्टाइलमध्ये केले जात आहे.


यामधील नवरदेव हा भारतीय आहे तर नववधू ही फोरेनर आहे. जेव्हा वरात येते, तेव्हा नवरदेव वधूच्या समोर विचित्र स्टाईलमध्ये नाचू लागतो. तिच्या नवऱ्याला नाचताना पाहून नवरीला देखील आवरले नाही आणि तिने सरळ आपला लेहेंगा वर पकडला आणि कंबर हलवून नाचू लागली.


वधूच्या अनोख्या डान्सने लोकांची मने जिंकली


जेव्हा तुम्ही नव वधूचा विचित्र पद्धतीचा डान्स पाहता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू इतकं वाढेल की, तुम्ही तुमचे हसु रोखू शकणार नाही. शिवम नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'जेव्हा भारत आणि आफ्रिका एकत्र येतात ...' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्सचा पाऊस पाडला आहे आणि या जोडप्याच्या डान्सवर कमेंट्स केल्या आहे. हे नवरा-बायको दोघेही एकापेक्षा एक आहेत.