Wedding video : चप्पल लपवण्याच्या विधीत नवरदेवाने कमी पैसे दिले, म्हणून मेहूणीने काय केले पाहा व्हिडीओ
खरेतर ही एक विधी आहे, ज्यामध्ये नवरदेवाच्या चपला लपवले जातात आणि त्याच्या बदल्यात मेहूण्या मागतील तेवढे पैसे त्यांना द्यावे लागतात.
मुंबई : लग्न म्हटलं की, खूप साऱ्या परंपरा आणि विधी येतात. भारतात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोकं रहातात, ज्यामुळे भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने लग्न होते. काही विधी तर अशा असतात की, आपल्याला त्या माहित देखील नसतात, तर काही विधी या सगळ्याच लोकांमध्ये केल्या जातात. त्यामधील एक म्हणजे नवऱ्याच्या चपला लपवणे.
आजकाल सोशल मीडियावर लग्नाच्या व्हिडीओंचा पूरच आला आहे. सगळेच लोक हळदी, मेहंदी, संगीत तसेच लग्नाच्या प्रत्येक विधीचा व्हिडीओ शेअर करत असतात. यापैकी काही व्हिडीओ इतके मजेदार आहेत की ते हसणे थांबवू शकत नाहीत. तर तेथे बरेच व्हिडीओ इतके भावनिक असतात की तुमच्या डोळ्यात अश्रू येतात. ज्याला यूझर्सकडून देखील खूप पसंती दर्शवली जाते.
आज आम्ही असाच एका व्हिडीओबद्दल तुम्हाला सांगणार आहोत, ज्याला सध्या सोशल मीडियावर जोरदार शेअर केले जात आहे. हा व्हिडीओ आहे, चपला लपवण्याच्या विधीचा. ज्यामध्ये मेहूण्या नवरदेवाच्या चपला लपवतात आणि त्यांच्याकडून त्या चपलांच्या बदल्यात पैसे घेतात.
खरेतर ही एक विधी आहे, ज्यामध्ये नवरदेवाच्या चपला लपले जातात आणि त्याच्या बदल्यात मेहूण्या मागतील तेवढे पैसे त्यांना द्यावे लागतात.
या व्हिडीओत देखील मेहूण्या चप्पलच्या बदल्यात नवरदेवाकडून पैसे घेतात. परंतु मेहूणी मात्र नवऱ्याने दिलेल्या पैशात समाधानी नाही. कारण नवरदेवाने दिलेले पैसे मोजताना मेहूणीने अशी काही रिअॅक्शन दिली के सगळे पाहातच राहिले.
चप्पल लपवण्याच्या कार्यक्रमातील मेहुणी आणि नवरदेवाचे भांडण सर्वांना आवडले आहे. सोशल मीडियावरही या व्हिडीओला सगळे लोकं लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.