मुंबई : सध्या सोशल मीडियावर रोज नव्या जोडप्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आपण कायम पाहातो लग्नमंडपात नवरा आणि नवरी सोफ्यावर बसलेले असतात आणि पाहुणे मंडळी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर येत असतात. पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्थिती  फार वेगळी आहे. व्हिडिओमध्ये नवी नवरी लाजत नाही किंवा मोठ्यांचे आशीर्वाद देखील घेत नाही, नवरी तर चक्क ठेका धरताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवरा आणि नवरी स्टेजवर उभे आहेत. सुरूवातीला नवरा लाजते. पण काही क्षणातचं ती साऊथ इंडियन गाण्यावर ठेका धरू लागते. नवरीला डान्स करताना पाहून नवरा देखील पत्नीसोबत ताल धरतो. महत्त्वाचं म्हणजे नवरीचा डान्स पाहून जमलेले पाहुणे चक्क होतात. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. शिवाय या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेन्टचा पाऊस पडत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 60 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. शिवाय 10 लाखपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.