Wedding News : लग्न म्हटलं की, बँड बाजा बरात तर ठरलं आहे. लग्नात नवरदेवासह वऱ्हाडी नाचले नाही तर ते लग्न कसलं...गेल्या काही वर्षांपासून डीजेवर लग्नाची वरात काढण्याचा ट्रेंड वाढला आहे. लग्न कुठल्याही समाजाचं किंवा धर्माचं असो संगीत हा त्याचा अविभाज्य भाग झाला आहे. पण लग्नातील संगीतावरील धम्माल मस्तीमुळे लग्न लावणारे पंडित किंवा निकाह लावणारे काझी यांना राग अनावर होतो. लग्नातील विधी आणि परंपराचा हा एक प्रकारचा अपमान आहे असं त्यांचं म्हणं असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातली बहराइच जिल्ह्यात एका नवरदेवाचं निकाह थांबला. कारण काझीने हा निकाह लावण्यास नकार दिला. कारण असं की, या नवरदेवाने डीजेच्या तालावर मिरवणूक काढली होती. (Wedding Viral news Kazi Refusal Nikah as groom Procession on DJ  Groom Apologize Trending News on Google video viral )


बहराइच जिल्ह्यातील फखरपूरमधील नाझिम अली यांच्या मुलीचा विवाह धाखेरवा गावातील अरमान या व्यक्तीच्या मुलगा सुब्रतीशी ठरला होता. निकाहच्या दिवशी सुब्रतीने घरापासून विवाहस्थळापर्यंत डीजेच्या आवाजात वाजतगाजत मिरवणूक काढली. 


हे पाहून काझी मौलाना सिकंदर अली नवरदेवासोबत इतर पाहुण्यांवर ते संतापले. एवढंच नाही तर त्यांनी निकाह लावण्यास नकार दिला. 


 


हेसुद्धा वाचा - होणाऱ्या सासूला नाचताना पाहून नवऱ्या मुलाने लग्नालाच दिला नकार; लग्नमंडपात हाय व्होल्टेज ड्रामा


 


या घटनेनंतर कितीतरी तास वादावादी सुरु होती. अखेर पंचायतीसमोर नवरदेवाला मौलानाचा राग शांत करण्यासाठी कान पकडून माफी मागावी लागली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


या प्रकारची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.