नवी दिल्ली : दागिने विक्रेत्यांची कमी झालेली मागणी, कमजोर झालेला आंतरराष्ट्रीय बाजार आणि सुट्ट्यांमुळे सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे सोन्याच्या किंमती ९० रुपयांनी घटल्या आहेत. सोन्याची किंमत ३०,२५० रुपये प्रती तोळा एवढी झाली आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या किंमतीमध्येही घट पाहायला मिळाली. चांदीची किंमत ३८ हजार रुपयांपेक्षाही कमी झाली आहे. बुधवारी स्वातंत्र्य दिन आणि शुक्रवारी अटल बिहारी वाजपेयींच्या निधनामुळे बाजार बंद होता. याचाही परीणाम सोनं-चांदीच्या किंमती कमी होण्यावर झाल्याचं बोललं जातंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीमध्ये ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचे दर ३०,२५० रुपये आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचे दर ३०,१०० रुपये प्रती तोळा आहेत. आठवडा भरामध्ये सोन्याचे दर ४५० रुपयांनी घसरले आहेत.


चांदी १ हजार रुपयांनी स्वस्त


आठवडाभरामध्ये चांदीचे दरही १ हजार रुपयांनी उतरले आहेत. तर चांदीच्या शिक्क्यांची किंमत २ हजार रुपयांनी घसरले आहेत. चांदीचे भाव ३८ हजार रुपये किलो एवढे झाले आहेत.