Viral News : प्रत्येक मुलीला वाटतं आपला बॉयफ्रेंड हा देखणा रूबाबदार असावा. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये एका तरूणाला त्याची गर्लफ्रेंडने 'मोटा' म्हणजेच जाड्या म्हणाली होती. पार्टनरचे हे शब्द त्याला चांगलेच टोचले होते.  मग काय तरूणाने मनाशी ठरवलं आणि करूनही दाखवलं. अर्जुन शहा असं संबंधित तरूणाचं नाव आहे. (weight fat loss diet workout nutrition of kanpur arjun shah fat to fit transformation journey Viral News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुनने 84 दिवसात तब्बल 40 किलो वजन कमी केलं. यासाठी त्याने जिममध्ये चांगलाच घाम गाळला आणि कसून मेहनत घेतली. 12  वी मध्ये असताना माझं पोट जास्त असल्यामुळे मी टी शर्ट घालायचो. माझी गर्लफ्रेंड मला बोलायची तू इतर मुलांप्रमाणे शर्ट का घालत नाहीस. हळूहळू तिने माझ्याशी बोलणं कमी केलं आणि मला तो मोटू म्हणायची. 


काही दिवसांनी ती दुसऱ्या मुलाला डेट करू लागल्याचं मला समजलं. माझ्या वाढलेल्या वजनामुळे असं काही झाल्यामुळे मी दुखावलो गेलो होतो. त्यानंतर मी फिट होण्याचं मनावर घेतलं. मला माझ्या ट्रेनरने एकदम साधा डाईट सांगितला होता. मी कमी खायचे आणि जास्त बर्न करायचो, याच फॉर्मुल्याने मी स्वत: माझं वजन कमी केल्याचं अर्जुनने सांगितलं.


 



अर्जुनने सर्वांना फिटनेसबाबत एक सल्लाही दिला. तुम्ही कोणाच्या मोटिव्हेशनची वाट नका पाहू आणि आजच पहिला दिवस समजून व्यायाम सुरू करा. अर्जुन हा उत्तर प्रदेशमधील कानपूरचा रहिवासी आहे.