Weird Tradition Of India : भारतात विविधपूर्णतेने नटलेले आहे. यात वेगवेगळ्या भाषेचे आणि समाजाचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे इथे वेगवेगळ्या परंपरा, श्रद्धा आणि प्रथा पाहिला मिळतात. पण या भारतातील अशा अनेक परंपरा आहे ज्यांचा बदल जाणून तुम्हाला धक्का बसेल. तामिळनाडूमध्ये अशी विचित्र परंपरा आहे, ज्यामध्ये मुलं त्यांच्या आजारी आणि वृद्ध आई वडिलांची हत्या (Custom To Kill The Elderly) करतात. काय आहे ही परंपरा काय आहे यामागील कारण आपण जाणून घेऊयात. (weird traditions of india children kill their old parents in tamil nadu You will be shocked to know the reason )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडूच्या दक्षिणेकडील भागांमध्ये थलैक्कूथथल नावाची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून पाळली जाते. या ठिकाणी परंपरेच्या नावाखाली मुलं आपल्या वृद्ध आणि आजारी पालकांना मारतात. या प्रथेला इंग्रजीत 'सेनिसाइड' म्हणजेच वृद्धांची हत्या करणं असं म्हटलं जातं. ही एक अशी प्रथा आहे, ज्यात गरीब आणि परंपरा यांचं मिश्रण पाहिला मिळतं. या परंपरेनुसार, जे वृद्ध लोक मृत्यूच्या मार्गावर आहेत किंवा कोमात आहेत त्या त्यांना मारलं जातं.


काय करतात परंपरेत?


या परंपरेनुसार अखेरचा श्वास घेणाऱ्या वृद्धांना मारण्यासाठी आधी त्यांना तेलाने आंघोळ करून नंतर नारळपाणी प्यायला दिलं जातं. त्यानंतर तुळशीचा रस आणि नंतर दूध त्यांना दिलं जातं. हे संपूर्ण पेय मृत्यूपूर्वीचं पेय मानलं जातं. यामुळे वृद्धाच्या शरीराचं तापमान झपाट्याने कमी होतं जातं. त्यांना सर्दी होते किंवा त्यांना हृदयविकाराचा झटका येतो ज्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. 


वृद्ध कसे मरतात?


या परंपरेत त्यांना मारण्यासाठी मुरुक्कू नावाची खारट जिलेबी दिली जाते जी चवीला कडू असते. ती खाताना घशात अडकते, त्यामुळे वृद्धाचा मृत्यू होतो. एवढंच नाही तर काही ज्येष्ठांना थंड पाण्याने आंघोळ घालण्यात येते. तर या वृद्धांना मारण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांचं पोट खराब करणं. त्यासाठी त्यांना पिण्यासाठी मातीमिश्रित पाणी दिलं जातं. यातून त्या वृद्धाचा मृत्यू होतो. धक्कादायक म्हणजे हे सगळं करत असताना दुसरीकडे त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येते. 


या परंपरेमागील कारण काय?


एका सर्व्हेतून असं सिद्ध झालं आहे की, ही परंपरा पूर्वीच्या काळापेक्षात आताच्या काळात मोठ्या प्रमाणात पाळली जात आहे. त्या काळात लोक वृद्धांची काळजी घेण्यासाठी घरी असायचे. तर या प्रथेनुसार केवळ अशा वृद्ध लोकांची निवड केली जायची जे मृत्यूच्या उंबरठ्यावर आहेत. अंथरुणावर पडलेले आहेत आणि त्यांचं मरण निश्चित आहे. गरीबमुळे अनेक कुटुंबांकडे वृद्धांची काळजी घेण्यासाठी पुरेसे पैसे नसायचे. म्हणून ही प्रथा पाळली जात होती. या धक्कादायक परंपेरला कुठे तरी थांबवण्याची गरज आहे. कारण अनेक जण आज या परंपेराचा गैरवापर करताना दिसून येत आहे.