कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गंभीर अपघातातून बचावल्या आहेत, परंतु यामध्ये छातीला आणि पाठीला दुखापत झाली आहे. याबाबत आता सरकार कडक तपासणी करत आहेत. खरेतर पश्चम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले की, त्यांच्या विमानासमोर एक दुसरे विमान आले होते. परंतु पायलटच्या तत्पर कृतीमुळे ही टक्कर टळली. या घटनेनंतर बॅनर्जींच्या चार्टर्ड फ्लाइटने घेतलेल्या मार्गासाठी मंजूरी देण्यात आली आहे का, हे देखील राज्य सरकारने डीजीसीएकडून जाणून घेण्यास सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या घटनेबाबत म्हणाल्या, "माझ्या विमानासमोर अचानक दुसरे विमान आले. आणखी 10 सेकंद अशीच परिस्थिती राहिली असती, तर समोरासमोर टक्कर झाली असती. पायलटच्या कार्यक्षमतेमुळे मी वाचलो. विमान 6,000 फूट खाली उतरले. ज्यामुळे माझ्या पाठीवर आणि छातीवर दुखापत झाली. मला अजूनही वेदना होत आहेत."


ही घटना त्यांच्यासोबत दुसऱ्यांना घडला आहे. त्याआधी शुक्रवारी संध्याकाळी, बॅनर्जी यांना वाराणसीहून शहराकडे घेऊन जाणाऱ्या चार्टर्ड फ्लाइटला गोंधळाचा सामना करावा लागला, त्यांच्या विमानावर हिंसकपणे दगडफेक देखील झाली.


यानंतर त्यांचे विमान नेताजी सुभाषचंद्र आंतरराष्ट्रीय विमानतळावर  सुरक्षितपणे उतरवण्यात पायलटला यश आले. परंतु या संपूर्ण घटनेमध्ये बॅनर्जींना तीव्र चढ-उतारामुळे दुखापतींचा सामना करावा लागला आहे. परंतु आता त्या ठिक असल्याचं देखील त्यांनी पत्रकारांना सांगितलं.