मुंबई : आपल्या अवती-भोवती अशा अनेक घटना घडत असतात, ज्यावर आपण विश्वास ठेवूचं शकत नाही, काही घटना अश्विसनीय असतात. आता देखील एक अशीच अविश्वनीय घटना पश्चिम बंगासलमध्ये घटली आहे. पश्चिम बंगालमधील उत्तर परगनामध्ये बकरीने चक्क आठ पायांच्या कोकरूला जन्म दिला आहे. जेव्हा आठ पायांच्या कोकरूबद्दल नागरिकांना माहिती झालं तेव्हा आठ पायांच्या कोकरूला पाहाण्यासाठी एकचं गर्दी जमली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संबंधित पूर्ण घटना बावड पंचायतच्या काममेघा परिसरातील आहे. याठिकाणी राहणाऱ्या सरस्वती मंडलच्या बकरीने दोन कोकरूनां जन्म दिला. त्यामधील एका कोकरूची परिस्थिती स्थिर होती. पण दुसऱ्या कोकरूने मात्र आठ पायांसोबत जन्म घेतला. आठ पायांच्या कोकरूला पाहून सरस्वती देखील घबरली. 


कारण आतारपर्यंत तिच्याकडे असलेल्या गाई आणि बकऱ्यांनी 4 पायांच्या बाळांना जन्म दिला. पण तिने पहिल्यांदा आठ पायांच्या कोकरूला पाहिलं. गुरूवारी जन्म घेतलेल्या हा कोकरू जास्त काळ जगू शकला नाही.  जन्म घेतल्यानंतर आठ तासांत कोकरूने अखेरचा श्वास घेतला. तुम्ही देखील आठ पायांच्या कोकरूबद्दल पहिल्यांदा ऐकलं असेल.