कोलकाता : १ जुलैपासून जीएसटी लागू करण्यासाठी देशात तयारी पूर्ण झालेली नाही. जोपर्यंत सगळे नियम आणि अटी जीएसटी कौन्सिलमध्ये मंजूर होत नाहीत, तोवर पश्चिम बंगालमध्ये जीएसटीसाठी आवश्यक विधेयकं मंजूर करणार नाही, अशी अडमुठी भूमिका ममता सरकारनं घेतलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीएसटीला जुलैमध्ये लागू केलं जाऊ नये, असं पश्चिम बंगालचे अर्थमंत्री आणि जीएसटी प्रकरणातील अधिकार प्राप्त समिती चेअरमन अमित मित्रा यांनीही म्हटलंय. यामुळे १ जुलैपासून जीएसटीच्या अंमलबजावणी मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. 


जीएसटी लागू करण्यासाठी तयारी पूर्ण नाही... याचे नियम आणि अटीही पूर्णत: तयार नाहीत. अशात जीएसटी लागू करणं अयोग्य तसंच गैरसोईचं ठरेल असं मित्रा यांचं म्हणणं आहे. पश्चिम बंगालमध्ये अनेक वस्तूंचे प्रस्तावित करांच्या दरात कपात हवीय... जेव्हापर्यंत जीएसटीवर सर्वसंमती बनली जात नाही... आणि सर्व समस्यांचं समाधान शोधला जात नाही, तोपर्यंत हे विधेयक पश्चिम बंगाल विधानसभेत सादर केलं जाणार नाही.


दरम्यान, १ जुलैपासून नवी करप्रणाली अस्तित्वात येणारच असं केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी स्पष्ट केलंय.