कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकीय पक्षांनी रियाला समर्थन देत, भाजप बंगाल आणि बंगाली लोकांना निशाणा करत असल्याचं म्हणलं आहे. रियाविरोधातही अशाच प्रकारचं अभियान चालवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुशांत बिहारचा असण्याचा वापर, बिहार निवडणूकांसाठी केला जात असून भाजपने सुशांतला न्याय मिळवून देण्याचे पोस्टर, बॅनर लावल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तृणमूल काँग्रेस आणि माकपाने, भाजपने बिहार विधानसभा निवडणुका समोर ठेऊन, एका बंगाली महिलेला, निशाणा करुन, आपला फायदा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप लावला आहे.पश्चिम बंगाल काँग्रेसने रियाच्या समर्थनार्थ मोर्चादेखील काढला.



तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ता सौगत राय यांनी सांगितलं की, रिया बंगाली आहे, न्यायालयात तिच्या दोषी होण्यापूर्वीच ती शोषित आहे. भाजपचा बंगालींबद्दलचा द्वेष पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. आसाम एनआरसीमध्येही असंच काहीसं पाहिलं असल्याचं त्यांनी म्हटलंय.


लोकसभा काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी, ड्रग्ज प्रकरणात रियाला झालेली अटक असंबद्ध असल्याचं सांगितलं. रियाचे वडील सेनेतील अधिकारी होते आणि त्यांनी देशाची सेवा केली आहे, रिया एक बंगाली ब्राम्हण महिला असल्याचंही चौधरी यांनी म्हटलंय.