CDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचं काय झालं, संरक्षण मंत्री राजनाथ यांचे लोकसभेत निवेदन
CDS बिपीन रावत (CDS General Bipin Rawat) यांच्यासह 13 जणांचा मृत्यू हेलिकॉप्टर दुर्घटनेत झाला. या अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन दिले.
नवी दिल्ली : CDS Bipin Rawat Helicopter Crash : देशाचे CDS बिपीन रावत (CDS General Bipin Rawat) यांच्यासह 13 जणांचा मृत्यू हेलिकॉप्टर दुर्घटनेत झाला. या सगळ्यांना आज लोकसभेत ( Lok Sabha) श्रद्धांजली वाहण्यात आली. या अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन दिले. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
हेलिकॉप्टर दुर्घटना, लोकसभेत संरक्षण मंत्र्यांचे निवेदन
तामिळनाडूतील कुन्नूरजवळ जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बुधवारी 12.08 वाजता हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. ज्यामध्ये CDS बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 14 लोक विमानात होते, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ यांनी यावेळी दिली.
- वायुदलाच्या विमानाचा १२.०८ वाजता संपर्क तुटला
- जनरल रावत यांच्यासह १३ जणांचे निधन
- सर्व पार्थिव आज संध्याकाळी दिल्लीत आणले जाणार आहेत.
- ग्रुप कॅप्टन वरुण सिंह व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. एअर मार्शल मानवेंद्रसिंह हे चौकशी करणार आहेत, अशी माहिती लोकसभेत संरक्षणमंत्री राजनाथ यांनी दिली. याबाबत त्यांनी निवेदन केले. आज सर्व अधिकारी जवानांचे पार्थिव संध्याकाळपर्यंत राजधानी दिल्लीत येत आहे. उद्या सर्व अधिकारी, जवानांवर उद्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारतीय वायुसेनेचे एमआय -17 हेलिकॉप्टर बुधवारी तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर भागात क्रॅश झाले. ज्यामध्ये देशाचे पहिले प्रमुख संरक्षण कर्मचारी जनरल बिपीन रावत (CDS General Bipin Rawat) आणि त्यांचे इतर अधिकारी होते. त्यांच्यासह १२ जणांचा मृत्यू झाला. यात पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्याही समावेश आहे. जनरल बिपिन रावत डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. जिथे ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करणार होते.