मुंबई : सध्याचा जमाना हा स्मार्ट आहे. स्मार्ट जगात वावरत असताना गूगल (Google)आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची गरज बनली आहे. काहीही अडलं की आपण आधी गूगल करतो. मात्र अशी भिती व्यक्त  केली जातेय की, आपण फोनमध्ये जे काही करतो, गूगल थेट त्यावर लक्ष ठेवते आणि गूगल आपली सर्व माहिती आपल्या सर्व्हरवर जमा करण्यास सुरवात करते. गूगल यूझसर्च्या कोणत्याही डेटाचा गैरवापर करू नका असे म्हणते. मात्र दररोजची एक्टिव्हीटी जेव्हा दुसर्‍यावर अवलंबून असते, तेव्हा ते चुकीच्या हातात जाते तेव्हा त्या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे गूगलकडे तुमची वैयक्तिक माहिती किती आहे हे तुम्ही सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकता. (what information is google saving you know in this way in minutes)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी चेक करा एक्टीव्हीटी


ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हालीा गूगल अकाऊंट सेक्शनमध्ये जावं लागेल. डेस्कटॉपवर तुमच्या जीमेल अकाऊंटचा फोटो दिसेल.  


डाटा एंड प्रायव्हसी (Date End Privacy)


गूगल अकाउंटच्या फोटोवर क्लिक करताच तुम्हाला मॅनेज अवर अकाउंटचा (Manege our Account) पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल, ज्यामध्ये डावीकडून तिसऱ्या क्रमांकावर Data and Privacy चा पर्याय दिसेल. तुम्हाला यावर क्लिक करावे लागेल.


यानंतर संपूर्ण माहिती तुमच्यासमोर उघडेल. यामध्ये तुम्ही काय केले आहे आणि तुम्ही कुठे होता हे बघता येईल. इथे तुम्हाला फक्त जीमेलच नाही तर गूगल मॅपची टाइमलाइन, यूट्यूब वॉच आणि सर्च हिस्ट्रीही पाहायला मिळेल.


एक्टीव्हीटी अशी बंद करा


याशिवाय, माय गुगल अॅक्टिव्हिटीनुसार (My Google Activity), तुम्ही गुगलवर कधी आणि काय शोधले हे देखील तुम्हाला कळू शकेल. तुमच्याकडे तो ऑप्शन बंद करण्याचा पर्याय देखील आहे. तुम्ही काही सेटिंगद्वारे ते बंद करू शकता.