मुंबई : जेव्हा जेव्हा आपण अडचणीत येतो तेव्हा आपण आपल्या अनुभवाच्या मदतीने त्यातून मार्ग काढतो. कोणाकडून तरी मदतीची अपेक्षा करतो. परंतु स्वत:चे प्रश्न स्वत: सोडवण्यासाठी लोकांना तल्लख बुद्धीची आवशकता असते. त्यामुळेत त्यांना अवघड प्रसंगातून मार्ग काढणं सोपं होतं. तुमच्याकडे देखील तल्लख बुद्धी असेल. तर तुमच्या मेंदूला किंवा तुमच्या डोळ्यांना या फोटमध्ये सर्वात आधी काय दिसलं ते सांगा. तुमच्या उत्तरचं ठरवणार की, तुमचं व्यक्तीमत्व कसं आहे ते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर एक ऑप्टिकल इल्युजन पिक्चर व्हायरल होत आहे, जो ब्लॅक अँड व्हाइट पिक्चर आहे. या चित्रात चंद्र, व्हेल मासा आणि एक सर्फर दिसत आहे. परंतु यासगळ्यात तुम्हाला प्रथम काय दिसतं, ते अत्यंत महत्वाचे आहे. कारण त्यावरुनच तुमचं व्यक्तिमत्व आम्ही तुम्हाला सांगतो.


जर तुम्ही आधी चंद्र पाहिला असेल


जर तुम्ही आधी चंद्र पाहिला असेल, तर तुम्ही एक अंतर्ज्ञानी व्यक्ती आहात. अनुभव असणे ही कोणतीही गोष्ट साध्य करण्याची गुरुकिल्ली आहे. जी तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनवेल. मोठा मासा पकडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे खुल्या समुद्रात नौकानयन करणे आणि त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. अविश्वासाच्या गर्तेतून बाहेर पडण्याची आणि लाटांवर स्वार होण्याची वेळ आली आहे.


जर तुम्ही आधी व्हेल पाहिला असेल 


जर तुम्ही सर्वात आधी व्हेल पाहिला असेल, तर तुम्हाला आयुष्यात एकटेपणा जाणवतो. कारण तुम्ही नेहमी नंबर वनच्या किंवा चांगल्याच्या शोधात असता. तसेच त्यांनी हे देखील लक्षात घेतले पाहिजे की. प्रेमाचा अर्थ कधीकधी दुसर्‍याच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारणे, कारण ही एक भागीदारी आहे.


जर तुम्ही सर्फर पाहिले


ते मुक्त मनाचे प्रतीक आहे. जर तुम्ही पहिला सर्फर पाहिला असेल, तर तुम्हाला लोकांमध्ये बांधून ठेवण्याची भीती वाटते. मोकळ्या आकाशात राहायला आवडते. परंतु प्रेम तुम्हाला मोकळ्या आकाशासारखे मुक्त वाटत नाही.