रांची : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात दोषी ठरवलं आहे.


लालू यादव दोषी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रांची स्पेशल सीबीआय कोर्टाने लालू यांच्यासह १५ आरोपींना दोषी ठरवलं आहे. ३ जानेवारीला त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. ७ जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा देखील आहेत.


काय आहे घोटाळा


1990 ते 1994 दरम्यान देवघर कोषागारमध्ये पशुंच्या चाऱ्यासाठी अवैधपणे 89 लाख, 27 हजार रुपये काढल्याचा आरोप आरोपींवर आहे. लालू यादव हे त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री होते. हा संपूर्ण घोटाळा तसा 950 कोटींचा आहे. ज्यामध्ये एक देवघर कोषागार संबंधित हे प्रकरण आहे. 


या प्रकरणात 38 जण आरोपी होते. ज्यांच्याविरोधात सीबीआयने 27 ऑक्टोबर, 1997 ला तक्रार दाखल केली. आज जवळपास 20 वर्षानंतर कोर्टाने या प्रकरणात आरोपींना दोषी ठरवलं आहे. याआधी चाईबासा कोषागारमधून 37 कोटी, 70 लाख रुपये ऐवढी अवैधपणे काढल्याच्या आरोपाखाली सर्व आरोपींना शिक्षा झाली आहे.


तुरुगांत रवानगी


लालूंना पोलिसांना ताब्यात घेतलं असून बिसरा मुंडा सेंट्रल जेलमध्ये त्यांचा रवानगी करण्यात आली आहे. लालू यांच्यासह १५ जणांना ३ जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे.