Har Ghar Tiranga: यंदाचा स्वातंत्र्यदिवस (Independence Day) भारतासाठी (India) खास असून 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकार अमृत महोत्सवही (Amrit Festival) साजरा करत आहे. त्याचपार्श्वभूमीवर सरकारने हर घर तिरंगा अभियानही (Har Ghar Tricolor Abhiyan) सुरूवात केली आहे. आजपासून (13 ऑगस्ट) या अभियानास सुरुवात होत आहे. या अभियाना अंतर्गत नागरिकांनी कार्यालयासह घरोघरी आजपासून म्हणजे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. प्रत्येक स्वतंत्र देशाचा स्वतःचा राष्ट्रध्वज (national flag) असतो. भारताच्या राष्ट्रध्वजाला तिरंगा म्हणतात. याचसंबंधीत आपण राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हर घर तिरंगा मोहीम काय आहे?


स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात 'हर घर तिरंगा' या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केलं आहे.  यासाठी सरकारने 20 कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान जन भारत सोबत हे लक्ष्य साध्य करण्याची सरकारची योजना आहे. आज घरोघरी तिरंगा मोहीम राबवली जात आहे. पण काहीवर्षापुर्वी प्रत्येक घरात तिरंगा फडकवता येत नव्हता. मात्र आता अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे सामान्य माणूस घर, कार्यालय आणि शाळांमध्ये तिरंगा फडकवू शकला. 2002 मध्ये ध्वज संहितेत बदल केल्यानंतर सर्वसामान्यांना हा अधिकार मिळाला. आज जेव्हा प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याची चर्चा आहे.


एवढचं नाही तर भारतीयांकडून नवनवीन मोहिम राबवत देशाचा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करताना दिसत आहे.  फक्त घरोघरी झेंडा फडकवूनच नाही तर ही  डिजीटल (Digital) माध्यमातून देखील साजरा करण्यात येणार आहे. स्वत: च्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर (Social Media Platform) प्रोफाईल पिक्चर (Profile Picture) बदलून या 13 दिवसाच्या कालवधीत तिरंगा प्रोफाईल पिक्चर म्हणून ठेवण्याचं आवहान पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी देखील त्यांच्या सोशल मीडीया प्रोफाईल पिक्चर (Profile Picture) तिरंगा ठेवला आहे. तरी घरोघरी तिरंगा लावणार आहात त्याचप्रमाणे डिजीटल माध्यमातून तुमचा प्रोफाईल फोटो तिरंगा ठेवत तुम्ही या अभियानात सहभागी होवू शकता.   


दरम्यान भारतीय ध्वज संहितेच्या कलम 2.1 नुसार (According to Section 2.1 of the Indian Flag Code) प्रत्येक व्यक्तीला सार्वजनिक, खाजगी किंवा शैक्षणिक संस्थेत तिरंगा फडकविण्याचे स्वातंत्र्य आहे. तथापि, तिरंगा फडकवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण 1971 च्या राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायद्यांतर्गत काही नियम आहेत जे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजेत.


तिरंगा फडकवण्याचे हे आहेत नियम


– तिरंगा फडकवताना तिरंग्याचा आदर सर्वोतोपरी असलाच पाहिजे. कधीही गलिच्छ किंवा फाटलेला झेंडा फडकावू नका.
– तिरंगा कधीही उलटा फडकू नये. जेव्हा तुम्ही तिरंगा फडकावता तेव्हा वरच्या बाजूला भगवा रंग दिसला पाहिजे.
– ध्वज कुणापुढे झुकता कामा नये. तसेच तिरंग्याभोवती इतर कोणताही ध्वज त्याच्यापेक्षा उंच नसावा किंवा त्याच्या बरोबरीचा असू नये.
– तिरंग्याच्या खांबावर दुसरे काहीही ठेवू नये. यामध्ये फुलांच्या हार आणि चिन्हाचा समावेश आहे.
– तिरंगा फडकवताना तो जमिनीवर किंवा पाण्यात नसावा.
– तिरंग्याचा वापर ड्रेस म्हणून करू नये. तुम्ही तुमच्या रुमाल, उशी किंवा अशा कोणत्याही वस्तूवर तिरंगा वापरू शकत नाही. तसेच तिरंग्यावर काहीही लिहिता येणार नाही.