Loan EMI Delay: प्रॉपर्टी, वाहन आणि इतर आवश्यक काम पूर्ण करण्यासाठी अनेकदा बँकेकडून कर्ज घेण्याची वेळ येते. यासाठी बँक तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी करते. या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर बँक तुमचं लोन अप्रुव्हल करतं आणि रक्कम तुमच्या खात्यात जमा करते. मात्र त्यानंतर ईएमआय (EMI) भरण्यासाठी जुळवाजुळव करावी लागते. अनेकदा ईएमआयची भरण्याची तारीख निघून जाते आणि पेनल्टी भरावी लागते. पण तुम्ही अडचणीत असाल तर बँकेकडून कर्ज स्थगितीच्या (Loan Moratorium) माध्यमातून ईएमआय भरण्यासाठी काही अवधी मागू शकता. कर्ज स्थगितीसाठी कोणतीही कंपनी किंवा व्यक्ती अर्ज करु शकते. मात्र त्यासाठीचे कारण वैध असलं पाहीजे. गृहकर्ज, कारकर्ज आणि क्रेडिट कार्डची परतफेड इत्यादींसाठी बँकेकडे अर्ज करू शकता. चला तर जाणून घेऊयात लोन मोरेटोरियम म्हणजे काय?


लोन मोरेटोरियमचा अर्थ काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोन मोरेटोरियम म्हणजे कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी काही अवधी दिला जातो. त्यामुळे आर्थिक अडचण असल्यास सदर व्यक्तीला दिलासा मिळतो. मोरेटोरियमच्या माध्यमातून तुम्ही कर्जाचा हफ्ता थांबवू शकता. पण ईएमआय माफ होत नाही किंवा तुम्हाला त्यावर आकारण्यात येणाऱ्या व्याजात कोणतीही सवलत मिळत नाही. म्हणजेच, ज्या कालावधीत तुम्हाला कर्जाच्या ईएमआयमधून सूट देण्यात आली आहे, त्या कालावधीत तुम्हाला कर्जावरील व्याज देखील भरावे लागेल. कर्जाच्या संपूर्ण ईएमआयच्या तुलनेत फक्त व्याजाची रक्कम खूपच कमी आहे.


बातमी वाचा- SBI एटीएममधून रोख रक्कम काढण्यापूर्वी ही बातमी वाचा, अन्यथा...


लोन मोरेटोरियमचा फायदा काय?


लोन मोरेटोरियममध्ये व्याज भरावं लागत असेल तर त्याचा उपयोग काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण जेव्हा तुम्ही ईएमआय चुकवता तेव्हा व्याजासह दंड भरावा लागतो. त्याचा परिणाम CIBIL स्कोअरवर होतो. पण लोन मोरेटोरियममुळे तुम्हाला काही काळ दिलासा मिळतो. यामुळे क्रेडिट स्कोअरवर कोणताही परिणाम होत नाही.