SBI एटीएममधून रोख रक्कम काढण्यापूर्वी ही बातमी वाचा, अन्यथा...

State Bank Of India: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाती असलेल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुमचे या बँकेत खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एटीएममधून पैसे काढण्याासाठी एसबीआयने एक नवीन सूचना जारी केली आहे.

Nov 23, 2022, 14:35 PM IST
1/5

SBI ATM

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असल्यास एटीएममधून पैसे काढण्यासाठी नवी सूचना जारी केली आहे. नवा नियम जाणून घ्या अन्यथा पैसे काढताना अडचण येऊ शकते. 

2/5

SBI ATM

स्टेट बँक ऑफ इंडिया खातेदारांना पैसे काढण्यासाठी रजिस्टर्स मोबाईलवर ओटीपी येईल. कारण एटीएममध्ये कार्ड इन्सर्ट केल्यावर पिन टाकल्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल. त्यामुळे ग्राहकांना त्यांचा फोन सोबत एटीएम मशिनमध्ये न्यावा लागेल.

3/5

SBI ATM

तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर सोबत घ्यावा लागेल कारण तुमचा OTP त्या नंबरवर येईल. OTP टाकल्यानंतरच तुम्ही पैसे काढू शकाल.

4/5

SBI ATM

10,000 रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम काढण्यासाठी ओटीपी आवश्यक आहे. यापेक्षा कमी रक्कम काढण्यासाठी तुम्हाला OTP ची आवश्यकता नाही. बँकेची ही सुविधा 1 जानेवारी 2020 पासून लागू होणार आहे.

5/5

SBI ATM

जेव्हा तुम्ही एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी जाल तेव्हा तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. यानंतर तुमच्या फोनवर OTP येईल. हा 4 अंकी कोड असेल. हा कोड फक्त एका व्यवहारासाठी वैध असेल.