Pink Tax : आपण कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी केली की आपल्यालाही एक विशिष्ट टॅक्स (Tax) भरावा लागतो. त्याशिवाय आपल्याला काही ती गोष्ट मिळत नाही. त्यामुळे आपल्याला टॅक्स कितीही महाग असो तो आपल्याला भरावाच लागतो. टॅक्स हा सगळ्यांनाच भरावा लागतो मग तो लहान मुलांच्या वस्तूंसाठी असो वा मोठ्यांच्या... अगदी स्त्री असो वा पुरूष... आपल्याला टॅक्स भरण्याशिवाय काही पर्याय नाही. परंतु तुम्हाला माहितीये का की असाही एक टॅक्स आहे जो भरल्याशिवाय दुकानदार काही सोडत नाहीत. हा टॅक्स महिलांसाठी (Pink Tax For Female) आहे आणि महिलांना माहितीही नसते की तो ते भरत आहेत. जाणून घ्या तुम्ही कसा चुकवाल हा टॅक्स, जाणून घ्या या लेखातून...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इनकम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स आणि जीएसटी (Income Tax and Corporate Tax) याबद्दल तुम्ही ऐकलेच असेल... परंतु यावेळी जाणून घेऊया की हा नक्की पिंक टॅक्स काय आहे? परंतु हा पिंक टॅक्स खुद्द महिला चुकवत असतात आणि त्याची कल्पनाही त्यांना नसते. हा पिकं टॅक्स नक्की आहे तरी काय याचा तुम्ही कल्पना आहे का? तेव्हा समजून घ्या की हा पिंक टॅक्स नक्की आहे तरी काय आणि हा तुम्ही वसूल कसा कराल? 


काय आहे पिंक टॅक्स? 


पिंक टॅक्स हा साधा टॅक्स नाही तर हा जेंडरनुसार वसूल केला जातो. जेव्हा कुठलेही एखादे प्रोडक्ट हे महिलांसाठी वसूल करण्यात येत असेल तर त्यावर हा पिंक टॅक्स लावला जातो. त्यातून एकप्रकारे हा एक अदृश्य टॅक्स आहे जो महिल्यांच्या खिशातून वसूल केला जातो. हा पिंक टॅक्स कुठला अधिकारिक टॅक्स नाही. हा टॅक्स सरकार वसूल करत नाही. हा टॅक्स सरकार (No Government Tax) नाही तर कंपन्या वसूल करतात. या काही कंपन्या महिलांचा खिसा रिकामा करतात. 


कसा चुकवायचा पिंक टॅक्स?


या प्रोडक्ट्समध्ये खासकरून महिलांचेच प्रोडक्ट्स असतात. उदाहरणार्थ, सामान, नेल पेंट, लिपस्टिक (Lipstick), आर्टिफिशियल ज्वेलरी, सेनिटरी पॅंड आणि यात अन्य काही प्रोडक्ट्स समावेश असतो.  या प्रोडक्ट्सशी किंमतही जास्त असते. यामध्ये पिंक टॅक्समधून महिलांना तिप्पट जास्त कर भरावा लागतो ज्याची त्यांनाही कल्पना नसते. 


पुरूषांना कसा काय भरावा लागतो पिंक टॅक्स? 


पुरूषांसाठी परफ्यूम, पेन, बॅंग, हेअर ऑईल आणि रेजरसारख्या गोष्टींवरही पिंक टॅक्स असतो. एकाच कंपनीत प्रोडक्ट्सची किंमतही वेगवेगळी असते. पुरूषांना माहिलांच्या मानानं कमी किंमत चुकावी लागते. तुम्ही सलुनमध्ये केस कापायला गेलात तर पुरूषांना कमी पण महिलांना जास्त चुकवावा लागतो.