स्वतःचे घर घ्यावे की भाड्याच्या घरात राहणे फायदेशीर?; पगाराचा हा फॉर्म्युला लक्षात घ्या
How Much Salary Needed To Buy A House: घर घेणे हे सगळ्यांचे इच्छा असते. मात्र घर घेताना पगार आणि इतर खर्चाचा ताळमेळ कसा बसवावा, असा प्रश्न पडतो. त्यासाठीच हा फॉर्म्युला लक्षात घ्या
How Much Salary Needed To Buy A House: स्वतःचं हक्काचे एक घर असावं हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण हे स्वप्न साकार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ असणे आवश्यक असते. नोकरी लागताच सर्वातप्रथम घर घेण्यासाठी धडपड करतात. खासकरुन मुंबई, पुणे यासारख्या मेट्रो शहरांत घर घेणे कठिण जाते. कारण घरांच्या किंमती, इतर खर्च याचा ताळमेळ बसवतानाच कसरत करावी लागते. होम लोन काढून घर घेत असताना कित्येत वर्षांची बचत डाउन पेमेंट भरण्यासाठी खर्च करतात. मग अशावेळी घर खरेदी करावं का?, की भाड्याच्या घरात राहावं? असा प्रश्न पडतो.
घर खरेदी करावं की भाड्याच्या घरात राहावं हे तुमच्या आर्थिक क्षमतेवर व पगारावर अवलंबून आहे. किती पगार असल्यास घर खरेदीकरणे तुमच्या फायद्याचे ठरु शकेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. घर विकत घेताना घराचे हफ्ते आणि सॅलरी याचा ताळमेळ बसणे गरजेचे आहे.
घर कधी खरेदी करावं?
घराची किंमत किती आहे आणि तुम्हाला दर महिन्याला किती पगार येतो, याचा एक हिशोब काढा. साधं गणित लक्षात घेतल्यास होम लोनचा हफ्ता तुमच्या पगारातील 20 ते 25 टक्के इतका असतो. उदाहरणार्थ, तुमचा पगार महिन्याला 1 लाख असेल तर 25 हजार रुपये महिन्याचा हफ्ता तुम्ही आरामात देऊ शकता. पण जर तुमचा पगार 50 ते 70 हजारांपर्यंत असेल आणि तुम्ही गृह कर्ज काढून घर विकत घेताय. तर तुमच्या या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करा.
तुमच्या घराचा महिन्याला हफ्ता 25 ते 30 हजारांपर्यंत बसेल. त्यामुळं आर्थिक दृष्ट्या हा निर्णय चुकीचा ठरु शकेल. कारण गृह कर्ज संपण्यासाठी साधारणपणे 20 वर्षांचा दीर्घ कालावधी जातो. तुमच्या पगारातील 20 टक्के भाग EMI भरण्यासाठी जात असेल तर तुम्ही नक्कीच घर खरेदी करण्याचा विचार करु शकता. तसंच, पगार जर 50 ते 70 हजार रुपयांपर्यंत असेल आणि EMI 20 हजार रुपये महिना जात असेल तर घर खरेदी करु शकता. म्हणजेच 25 लाख किंमतीपर्यंत घर खरेदी करु शकता.
घराची किंमत 30 लाख पर्यंत जात असेल तर 50 ते 70 हजारपर्यंत पगार असलेल्यांनी भाड्याच्या घरातच राहणे फायद्याचे आहे. अशावेळी प्रत्येक महिन्याला पैशांची बचत कशी होईल, याकडे लक्ष द्यावे. त्यानंतर पगार 1 लाखांपर्यंत पोहोचेल अशावेळी अधिक जास्त डाऊन पेमेंट करुन घर खरेदी करु शकता. जितकं अधिक डाऊन पेमेंट कराल तितका EMI कमी होईल. आर्थिकदृष्ट्या पाहायला गेलं तर, पगार एक लाख असेल 30 ते 35 लाखांपर्यंत घर खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तसंच, पगार दीड लाखांपर्यंत असेल तर घरासाठीचे बजेट 50 लाखांपर्यंत वाढवू शकता. म्हणजेच पगाराच्या 25 टक्के रक्कम घराचे हफ्ते चुकवण्यात जाईल.