Credit Card: बँका ग्राहकांना त्यांचा सिबिल स्कोअर पाहूनच क्रेडिट कार्ड ऑफर करतात. कठीण प्रक्रियेतून गेल्यानंतर क्रेडिट कार्ड मिळाल्यास आनंद होतो. पण क्रेडिट कार्ड वापरणं ही देखील एक कला आहे. कारण क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय चांगलीच महागात पडू शकते. यासाठी आपलं महिन्याचं उत्पन्न आणि क्रेडिट कार्डचा खर्च याचा तालमेल बसणं गरजेचं आहे. पण अनेकांना क्रेडिट कार्ड वापरता येत नाही आणि कर्जाचा डोंगर उभा राहतो. त्यामुळे फायनान्शिअल स्कोअरवर परिणाम होतो. जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल आणि त्याचा वापर करता येत नसेल तर बंद करणं योग्य पाऊल ठरेल. क्रेडिट कार्ड बंद करण्यापूर्वी बॅलेंस तपासून घ्या. तसेच आपल्याला व्यवहारातून काही रिवॉर्ड पॉईंट्स मिळाले असतील तर ते वापरून घ्या. त्याचबरोबर ऑटो पद्धतीने एखादी बिलिंग अटॅच असेल किंवा ट्रान्सफर असेल तर तात्काळ बंद करा. चला जाणून घेऊयात क्रेडिट कार्ड बंद करण्याचा आरबीआयचा नियम काय आहे?


कसं कराल डेबिट कार्ड बंद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रेडिट कार्ड खातेदाराने सर्वात आधी कस्टमर सर्व्हिस सेंटरला कॉल करावा. कस्टमर केअर पर्सनला क्रेडिट कार्ड बंद करण्याची विनंती करा. क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या विनंतीनंतर बँक तुमच्याशी संपर्क साधेल. त्याचबरोबर कार्ड बंद करण्याचं कारण विचारेल. त्यानंतर कार्ड बंद करेल.


या व्यतिरिक्त तुम्ही ईमेल करून क्रेडिट कार्ड बंद करू शकता. काही बँका ग्राहकांची क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी ऑनलाईन रिक्वेस्ट स्वीकारतात. यासाठी बँकेच्या वेबसाईटवर जा, फॉर्म भरा आणि सबमिट करा. रिक्वेस्ट केल्यानंतर बंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी बँक प्रतिनिधींना कॉल करा.


बातमी वाचा- Saving Tips: सेव्हिंग करण्यासाठी चिल्लरही कामाची, या टिप्स ठेवा लक्षात


काय आहे आरबीआयचा नियम


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, जर ग्राहक आपलं क्रेडिट कार्ड बंद करू इच्छित असेल तर बँक किंवा NBFC ला त्यांचा अर्ज स्वीकारला आवश्यक आहे. बँकेला पुढच्या 7 दिवसात क्रेडिट कार्ड बंद करावं लागेल. पण यापूर्वी ग्राहकांना  बँकेची शिल्लक रक्कम भरावी लागेल.