मुंबई : जगात उजव्या हाताने काम करणाऱ्या लोकांच्या तुलनेत डाव्या हातान् काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. एका अहवालानुसार, पाश्चिमात्य देशातील केवळ 10 टक्के लोक लेफ्टी म्हणजेच डाव्या हाताने काम करण्यास प्राधान्य देतात. परंतु तुम्ही लोकांना हे बोलताना ऐकले असेल की, लेफ्टी लोकं हुशार असतात की, राईटी? यांमध्ये सर्वोत्तम कोण आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शास्त्रज्ञांनी या वादाचे उत्तर जगासमोर ठेवले आहे. परंतु तरीही दोघांपैकी कोण हूशार यावर जगभरात वाद सुरू आहे. पण आम्ही तुम्हाला काही शास्त्रज्ञांच्या संशोधनाबद्दल सांगणार आहोत.


कोण उजव्या हाताचा जास्त वापर करेल किंवा कोण डाव्या हाताचा वापर करेल हे अंशतः जिन्सद्वारे निश्चित केले जाते. जर्नल ऑफ इंटरनॅशनल न्यूरो सायकोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांच्या मेंदूच्या उजव्या आणि डाव्या बाजू एकत्र मिळून चांगले काम करतो. परंतु हे अद्याप सिद्ध झालेले नाही की, डाव्या हाताने काम करणारे लोकं हे उजव्या हातापेक्षा जास्त वेगवान किंवा चांगले काम करु शकतात.


अभ्यासानुसार, डाव्या हाताने लिहिणारे विद्यार्थी शाळेत अधिक संघर्ष करतात. त्यांना अॅटेन्शन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) ची लक्षणे आढळतात. अमेरिकन जर्नलच्या मते, काही प्रकरणांमध्ये डाव्या हाताने काम करणारे लोकं हुशार असतात. खरं तर, डाव्या हाताच्या मेंदूची उजवी बाजू शरीराच्या डाव्या बाजूच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवते यामुळे, अशा लोकांमध्ये संगीत क्षमता देखील वाढते. म्हणूनच डाव्या हाताने काम करणारे लोकं क्रिएटिव प्रोफेशनमध्ये काम करताना तुम्हाला जास्त पाहायल मिळतात.


सायन्स भलेही उजव्या हातांने काम करणाऱ्यांपेक्षा डाव्या हाताला काम करणाऱ्या लोकांना हुशार मानतो परंतु आपले साहित्य आणि पुरान असे म्हणत नाही. असे म्हटले जाते की, मध्ययुगात दानवांना लेफ्टी मानलं जायचं. जपान, चीन आणि इतर आशियाई देशांमध्ये डाव्या हाताची संख्या पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.


जेनेटिक थेअरी


डाव्या आणि उजव्या हाताने काम करणाऱ्या लोकांबद्दल जेनेटिक थेअरी म्हणते की, एखाद्याच्या त्याच्याउजव्या हाताने किंवा डाव्या हाताने काम करेल हे त्याच्या आईच्या गर्भातच निर्णय घेतला जातो.


मुले त्यांच्या पालकांकडून विशिष्ट प्रकारच्या जिन्स वारसा घेतात. परंतु हे जिन्स नक्की आले कुठून आणि ते कसे सापडले किंवा विकसीत केले गेले .यावर संशोधन अद्याप सुरू आहे. परंतु जिन्समुळे मुलं उजव्या हाताने काम करणारी आणि डाव्या हाताने काम करणारी बनतात.