Gratuity Rule: नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ग्रॅच्युटीबद्दल ऐकलं असेलच. पण अनेकांना याबाबत फारसं माहिती नसतं. त्यामुळे आपण ग्रॅच्युटीसाठी पात्र आहोत की नाही असा प्रश्न पडतो. जेव्हा कर्मचारी एखाद्या कंपनीत अनेक वर्षे काम केल्यानंतर नोकरी सोडतो तेव्हा त्याला पीएफ, पेन्शनसोबत ग्रॅच्युटी दिली जाते. अनेक जण एका कंपनीत ठरावीक काळ नोकरी केली की, दुसऱ्या कंपनीत धाव घेताता. अशा लोकांनाही निकषाची पूर्ताता केली की, ग्रॅच्युटी मिळू शकते. सरकारनं नुकतंच लेबर कोडमध्ये ग्रॅच्युटीबाबत नियमांमध्ये बदल करण्याचे संकेत दिले होते. मात्र याबाबत अजून ठोस असा निर्णय झालेला नाही. मग आपल्याला ग्रॅच्युटी मिळणार की नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याची उत्तर जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाच कंपनीत काही वर्षे काम केल्याच्या मोबदल्यात कंपनी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी देते. देशात सर्व कारखाने, खाणी, ऑईल फिल्ड, बंदरं आणि रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी अॅक्ट लागू होतो. त्याचबरोबर 10 पेक्षा जास्त लोकांना नोकरी देणाऱ्या दुकानं आणि कंपनी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी बेनिफिट मिळते. तसं पाहिलं तर पाच वर्षांपर्यंत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी रक्कम दिली जाते. पण काही प्रकरणात पाच वर्षांपेक्षा कमी सर्व्हिस करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ग्रॅच्युटी मिळू शकते. ग्रॅच्युटी अॅक्टच्या सेक्शन 2-ए मध्ये सांगितलं आहे की, सलग काही वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळू शकते. म्हणजेच पाच वर्षे पूर्ण नसली तरी ग्रॅच्युटी मिळू शकते. 


बातमी वाचा- Union Budget 2023: करदात्यांकडून घेतलेला पैसा सरकार कुठे खर्च करते; जाणून घ्या एक एक पैशाचा हिशेब


दुसरीकडे, भूमिगत खाणींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सतत 4 वर्षे 190 दिवस पूर्ण केले, तर त्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. तर, इतर संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी 4 वर्षे 240 दिवस काम केल्यानंतर ग्रॅच्युइटीसाठी पात्र होतात. विशेष म्हणजे ग्रॅच्युटी कॅलक्युलेशनमध्ये नोटीस पिरीयडही जोडला जातो.