Superstition In India : दृष्ट लागू नये म्हणून आपल्याकडे घराच्या दारावर , नवीन वस्तूंवर लिंबू मिरची बांधताना आपण पाहिलं असेलच . तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का लिंबू मिरची आणि वाईट दृष्टी किंवा नजर लागणे या सर्वांचा काय संबंध आहे. नेमकं लिंबू मिरची बांधल्याने दृष्ट का लागत नाही. लिंबू मिरची लावण्यामागे  नेमकं काय सत्य दडलंय हे तुम्ही ऐकलंत तर तुम्हालाही धक्का बसेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याकडे खूप वर्षांपासून एक प्रथा आहे, ते म्हणजे कोणतीही नवीन गोष्ट असेल जस की गाडी घर दुकान त्याला वाईट शक्तींपासून दूर ठेवण्यासाठी दारावर लिंबू मिरची बांधली जात. बऱ्याचदा काली बाहुली देखील लटकवली जाते, इतकंच काय तर वर लिहिलं सुद्धा जातं की बरी नजर वाले तेरा मुह काला...रस्त्यांवर चौकांवर बऱ्याचदा काही ठराविक दिवशी लिंबू किंवा तत्सम गोष्टी टाकलेल्या दिसतात. त्यावर पाय देऊ नये त्याला ओलांडून जाऊ नये असं आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींनी आपल्याला सांगितलेलं असेलच. चुकून जरी त्यावर पाय टाकला किंवा ते ओलांडलं तर ती बाधा आपल्या मागे लागेल अश्या अनेक अंधश्रद्धा आपल्याकडे फार पूर्वीपासून चालू आहेत.  (superstition in india)


पण तुम्हाला माहित आहे का , आपल्या भारतात पूर्वीपासून काही प्रथा पाळल्या जातात त्यामागे नेहमीच काहींना काही कारण, मुख्यतः वैज्ञानिक कारण आहे पण काळानुसार याची जागा अंधश्रद्धेने घेतली आणि लोक त्याचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावू लागले.  (logic scientific reason behind superstition)


पण सोशल मीडियावर (social media) द सायबर झील (the cyber zeal) या नावाने पेज चालवणाऱ्या एका व्यक्तीने या मागची काही कारण सांगितली आहेत जाणून घेऊया त्याने नेमकं काय सांगितलं आहे. (Superstition In India )



टांगलेल्या धाग्यात नेमकं असत काय ?
 लिंबू, मिरची, कोळसा आणि एखादा धार किंवा टोकदार दगड हे सगळं एकाच धाग्यात बांधून टांगलं जातं.


दारावर लिंबू मिरची लावण्यामागे शास्त्रीय कारण जाणून घेऊया 
कधीपासून प्रथा सुरु झाली
फार फार पूर्वी जेव्हा मूलभूत गोष्टी जस कि चप्पल , वीज , गाडी  या कशाचाच शोध लागला न्हवता त्यावेळी लोक घरावर दुकानावर अश्या प्रकारे लिंबू मिरची टांगून ठेवत असत. आणि आपल्या सोबत घेऊनसुद्धा जात असतं. 



प्रथा बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा वीज, चप्पल आणि कार, गाड्या यांचा शोध लागलेला नव्हता. त्यावेळी लोक आपल्या घरावर, दुकानांवर लिंबू मिरची टांगत असे. बऱ्याचदा सोबतही घेऊन जात.


जाणून घ्या खरं कारण
फार पूर्वी ओक बराच प्रवास पायी करत असत दूरचा प्रवास करताना साहजिक आहे तहान लागणार मग अश्या वेळी काय करायचं स्वच्छ पाणी अगदीच उपलब्ध असेल असं नाही. जिथे कुठे थोडासा पाणी मिळत असे ते मग कोळश्यावर टाकून गाळून घेतलं जायी त्यामुळे पाणी शुद्ध होत असे


पाण्यात लिंबू टाकून प्यायल्याने बराच वेळासाठी तहान भूक लागत नाही त्यामुळे प्रवासादरम्यान, लिंबू आणि पाण्याचं मिश्रण प्यायलं जात. 
 
चप्पल नसल्याने पायी जात असताना काही काटा लागला किंवा विंचू साप चावला तर हाच धागा काढून दंश झालेल्या ठिकाणी करकचून बांधला जातो. जेणेकरून ते विष संपूर्ण शरीरात पसरू नये. 


चुकून जरी विष शरीरात पसरल तर त्या व्यक्तीला मिरची खायला दिली जाते , आता तुम्ही म्हणालायाचा काय संबंध तर जर मिरची तिखट लागली तर एकत्र साप बिनविषारी असेल किंवा विष शरीरात पसरलं नसेल. आणि तिखटपणा जाणवला तर याच्या उलट अर्थ निघे. 


आणखी एक उपाय केला जातो तो म्हणजे साप विषारी आहे असं कळलं तर त्या ठिकाणी धाग्यात बांधलेल्या धारधार दगडाने कापलं जात जेणेकरून रक्त निघेल आणि त्यासोबत त्या ठिकाणी असलेलं विष निघून जाण्यास मदत होईल.