Medicines Expiry Date: आपण जेव्हा कधी एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्याच्यावर त्याची उत्पादन (Manufacturing Date) आणि मुदत संपणाऱ्या तारखेचा (Expiry Date) उल्लेख केलेला असतो. प्रत्येक वस्तूवर या दोन्ही तारखा लिहिलेल्या असता. दुधापासून ते ब्रेडपर्यंत सगळींकडेच या तारखा नमूद केलेल्या असतात. पण अनेकदा आपण त्यावर उल्लेख असतानाही गरज असल्याने Expiry Date संपलेल्या गोष्टींचं सेवन करतो. यामध्ये अनेकदा औषधांचा समावेशही असतो. पण जर तुम्हीही असं करत असाल तर त्याचे धोके समजून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औषधांवर उल्लेख असणारी Expiry Date संपली याचा अर्थ आता त्याचं रुपांतर आता विषात झालं किंवा त्याचा अजिबात प्रभाव होणार नाही असा होत नाही. अशा स्थितीत या Expiry Date चा नेमका काय अर्थ होतो ते समजून घेऊयात. 


Expiry Date चा अर्थ काय?


जगातील प्रत्येक कंपनी औषधावर Expiry Date चा उल्लेख करत असते. औषधांवर असणाऱ्या या तारखेचा अर्थ कंपनी त्यानंतर त्या संबंधित औषधाची सुरक्षा किंवा प्रभावासंबधी खातरजमा करु शकत नाही. 


Expiry Date संपलेलं औषध खाल्ल्यास काय करावं?


मुळात Expiry Date संपलेल्या औषधाचं सेवन करु नये. असं करणं तुमच्यासाठी फार धोकादायक ठरु शकतं. पण जर तुम्ही चुकूनही हे औषध खाल्लं तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. तुमच्या घरात लहान मुलं असल्यास घरातील औषधं त्यांच्या हाताला लागणार नाही याची खात्री बाळगली पाहिजे.


डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका


आजकालच्या इंटरनेटच्या जमान्यात Google, YouTube मुळे प्रत्येकाला आपण तज्ज्ञ असल्याचा भास होऊ लागला आहे. त्यातच अनेक घरांमध्ये स्वयंघोषित डॉक्टर तयार झाले असून आपल्या मनाप्रमाणे औषधं घेत असतात. पण असं करु नये असा सल्ला आहे. कोणत्याही औषधाबद्दल शंका असल्यास प्रथम डॉक्टरांना संपर्क साधला पाहिजे. अन्यथा तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.