Forget to collect cash from ATM: एटीएममधून पैसे काढणे ही सर्वसामान्य बाब आहे. परंतु अनेक वेळा रोख काढल्यानंतरही (ATM cash withdrawal) प्रोसेसबाबतीत चुका घडून येतात. त्यामुळे ट्रांजेक्शन फेल होते. अनेकवेळा कार्ड मशीनमध्येच विसरतो. परंतु काही वेळा असेही होते की आपण पैसे काढल्यानंतरही खिशात ठेवण्यास किंवा सोबत घेण्यास विसरतो. 


रोख लगेच नाही काढली तर बसू शकतो फटका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरे तर बहुतांश एटीम असे असतात की,  आपण रोख खिशात लगेच ठेवतो. तोपर्यंत आपल्याला कार्ड मशीनच्या बाहेर काढता येत नाही.  परंतु आज काही एटीम असे आहेत की, जे फक्त स्वॅपिंग बेस्ड आहेत. अशा एटीएममधून रोख रक्कम आपण कलेक्ट करणे विसरू शकतो. 


आपण कार्ड स्वॅप करून डिटेंल्स टाकून पैसे withdrawal केले. परंतु त्यानंतर पैसे सोबत घेण्यास विसरलो तर, याविषयी बँकेची जबाबदारी राहत नाही. हे एक अधिकृत ट्रांजेक्शन मानले जाते. त्यामुळे पैसे सोबत घेण्यास विसरल्यास सीसीटीव्ही फुटेज एकमेव आधार असतो. एटीएमने एकदा रोख मशीनमधून बाहेर काढली की ती पुन्हा परत आत जात नाही.


बँकेत तक्रार करा


अशी चूक झाल्यास तुम्हाला पैसे परत मिळत नाही. तुम्हाला पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते. तरी देखील असा सल्ला दिला जातो, की आपण ज्या बँकेचे एटीएम आहे. त्या बँकेकडे तक्रार नोंदवायला हवी.  
बँकेला आपला ट्रांजेक्शन नंबर, तारीख आणि वेळ याची माहिती द्या. त्यानंतर बँक त्यावर काय पाऊले उचलते.  त्याबाबत ट्रॅक ठेवा.


असे असले तरी, शक्यतो एटीममध्ये पैसे विसरू नका. कारण याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. असा जाणकारांचा सल्ला आहे.


अनेक वेळा रोख न आल्यासही बँलेन्स कापल्याचा SMS 


अनेकवेळा असे होते की, आपण एटीएम कार्ड स्वॅप करतो. डिटेंल्स टाकतो आणि पैसे बाहेर येण्याची वाट पाहतो. परंतु मशीनमधून रोख बाहेर न येताच बँलेन्स कापल्याचा SMS मोबाईलवर येतो. अशावेळी तुम्ही हैराण होऊ शकता. अशावेळी तुम्ही घाबरण्याचं काही कारण नाही. तुमच्या खात्यातून कापले गेलेले पैसे पुढच्या 24 ते 48 तासात परत येतात. जर असे झाले नाही. तर तुम्ही आपल्या बँकेच्या शाखेला  जाऊन तक्रार नोंदवू शकता.